मित्रानो तुम्ही कोणी शेवलाची भाजी खाली असेल की नाही माहीत नाही पण मी खूप खाल्ली आहे. माझा जन्म खेड्यात झाला त्यामुळे रानभाज्या खाण्याची मला पहिल्यापासूनच आवड आहे. शिवाय एकदा पावसाळा चालू झाला की डोंगरात, रानात शेतात अनेक ठिकाणी येणाऱ्या रान भाज्यांची चलती गावा ठिकाणी पाहायला मिळते. या रानभाज्या खायला जितक्या चविष्ट लागतात तितक्याच त्या आपल्या शरीरासाठी ही पौष्टीक असतात.
शेवळाची भाजी पहिला पाऊस पडला की ही आमच्याकडे विकायला येते. ठाकरी, कातकरी लोक ही भाजी विकायला आणतात. जसं बटाटा रताळी कंद आहेत त्याचप्रमाणे ह्या झाडाची ही जमिनीत कंद असतात आणि ही त्याच्यावर आलेली फुल असतात. म्हणजे काय तर शेवळाची भाजी होय. दिसायला तशी इतकी आकर्षक आणि हिरवी गार नसली तरी या भाजीला एक छान चव असते. ही भाजी गरम खाऊ नये म्हणतात. कारण तोंडाला खकवते त्यासाठी त्यात काकडाची फळ असतात.
ही फळं आवळ्या सारखी दिसायला असतात. त्यात एक बी असते ती टाकतात किंवा त्याच्यासोबत एक पाला देतात त्याला बोंडग्याचा पाला असे म्हणतात. त्याच्यामुळे या भाजीला थोडासा आंबटपणा येतो आणि ती खाजवत नाही किंवा तुम्ही आंबा ही टाकू शकता. ही भाजी साफ करताना त्याच्या आतमध्ये असणारा पिवळा भाग तो काढून फेकून द्यावा.
भाजी करताना पहिल्यांदा साफ करून घ्या. वरचा लहान असणारा पदर काढून टाका. नंतर ही भाजी बारीक कापून घ्या. धवून मस्त मवू शिजवून घ्या त्यानंतर कांदा आणि लसूण मोहरी, लाल मसाला फोडणी द्या थोड कांदा आणि खोबऱ्याचा वाटण लावा आंबट टाका शिजू द्या. ही भाजी काही लोकं अंबाडी सुकटी मध्ये ही करतात. खायला एकदम झकास लागते ही भाजी.
असे म्हणतात की ज्यांना मूत्राशयाच्या आजाराने घेरले आले अशांना या भाजीचा खूप लाभ मिळतो. या शेवळाची पाने साखर आणि दुधासोबत खाल्याने या आजारावर परिणामकारक आहे आणि म्हणून ज्या लोकांना असा आजार आहे त्यांनी ही भाजी नक्की खा. आणि तुम्ही ही भाजी कधी खाली आहे का? आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा.