गुगलवर सर्वात जास्त सर्च केलेला कोणता कीवर्ड असेल तर How To Earn money Online? प्रत्येक व्यक्ती घरात राहून इतर आपण काय करू शकतो? ज्याने आपल्याला पैसे मिळतील? असा विचार करत असतो. सहाजिकच आहे असा विचार करणे, कारण कितीही चांगला जॉब केला तरी महिन्याच्या शेवटी हातात खूप कमी पैसे उरतात. आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत जिथून तुम्ही ऑनलाईन पैसे कमावू शकता.
तुम्ही फेसबुक तर सर्वच वापरत असणार पण कधी हा विचार केला आहे की फेसबुक वरून सुद्धा तुम्ही पैसे कमावू शकता. पण ह्यासाठी कोणताही शॉर्टकट नाहीये. तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात पैसे कमवायचे असतील तर तुम्हाला मेहनत ही घ्यावीच लागेल. फेसबुकवर पैसे कमावण्यासाठी तुम्हाला फेसबुकची माहिती असणे गरजेचे आहे. तरच तुम्ही प्रत्येक क्षेत्रात पैसे कमाई करू शकता. फेसबुकवर तुम्ही अनेक भागात पैसे कमाई करू शकता.

फेसबुक वरून पैसे कसे कमवाल? (Earn money from Facebook)
- फेसबुक इन्स्टंट आर्टिकल
- व्हिडियो Monetization
- पेड पोस्ट
- मार्केटिंग
फेसबुक इन्स्टंट आर्टिकल (Facebook Instant Article)
तुम्हाला जर गुगल एडसेंस काय भानगड आहे माहित असेल तर फेसबुक इन्स्टंट आर्टिकल काय प्रकार आहे तुम्हाला समजण्यास सोपे जाईल. गुगल एडसेंसमध्ये एखादा सर्च केलेला कंटेंट तुम्हाला मिळतो तर फेसबुक इन्स्टंट आर्टिकल मध्ये तुम्ही तुमच्या आवडीचा कंटेंट लोकांपर्यत पोहोचवता.

फेसबुक इन्स्टंट आर्टिकलमध्ये जर तुम्हाला पैसे कमवायचे असतील तर त्यासाठी तुमच्याकडे एक सहा महिने जुने फेसबुक पेज, एक वेबसाईट जिथे दिवसाला कमीतकमी २ ते ३ हजार ट्रॅफिक असणे गरजचे आहे. तुमची वेबसाईट तुम्ही Facebook Audience Network मध्ये जोडावी लागते. ही प्रोसेस कशी असते सांगायला गेलो तर आर्टिकल खूप मोठा होईल आणि तुम्हाला कळणार देखील नाही. त्यासाठी तुम्ही यूट्यूब सर्च करा. ह्या संदर्भात असंख्य व्हिडियो स्टेप बाय स्टेप तुम्हाला मिळून जातील.
जर तुमच्याकडे वेबसाइटवर चांगली ट्रॅफिक येत असेल तर तुम्ही ह्या क्षेत्रात महिन्याला २० हजारपासून १० लाखापर्यंत पैसे कमावू शकता.
फेसबुक व्हिडियो Monetization
फेसबुकने यूट्यूबसारखे आपले इन्स्ट्रीम्स Ads हे फीचर लाँच केलं आहे. ज्या प्रमाणे तुम्ही यूट्यूबवर व्हिडियो पोस्ट करून पैसे कमावू शकता तसेच फेसबुकवर सुद्धा व्हिडियो पोस्ट करून पैसे कमावू शकता. पण त्यासाठी सुद्धा काही अटी आणि नियम आहेत.

व्हिडियो Monetization कसे चालू कराल?
तुमच्याकडे एक फेसबुक पेज असले पाहिजे. जिथे कमीतकमी १० हजार followers असणे गरजेचे आहे. तिथे पोस्ट करत असलेला व्हिडियो कंटेंट स्वतःचा असावा. कुणाचेही कॉपी केलेले व्हिडियो पोस्ट करून तुम्हाला अॅप्रोवल मिळणार नाही. पोस्ट केलेला व्हिडियो तीन मिनिट किंवा त्याहून अधिक असावा. पोस्ट केलेला व्हिडियो ३० हजार मिनट तरी पाहिलेला असावा. आणि महत्त्वाचे म्हणजे तुम्ही १८ वर्ष वयोगट पार केलेले असावे.
ह्या सर्व गोष्टी तुमच्या पेजच्या पूर्ण असतील तर तुम्ही तुमचे फेसबुक पेज रिव्ह्यूसाठी टाकू शकता. रिव्ह्यू टाकल्यानंतर काहीच दिवसात फेसबुक टीम तुमचे पेज पडताळून पाहते. जर तुम्ही सर्व गोष्टी पार केल्या असतील तर तुमचे पेज व्हिडियो ads दिसायला सुरू होते. मराठी भाषेतील व्हिडियो सुद्धा तुम्ही अपलोड करू शकता. इथे यूट्यूबपेक्षा जास्त कमाई तुम्ही करू शकता.
व्हिडियो Monetization मार्फत तुम्ही महिन्याला ७ हजार पासून २० लाखापर्यंत पैसे कमावू शकतात. भारतात असंख्य क्रिएटर कमावत सुद्धा आहेत.
पेड पोस्ट (Paid Post)
पेड पोस्ट मार्फत तुम्हाला खूप सारे पैसे कमावण्याची संधी असते. फक्त ह्यात एक महत्त्वाचा मुद्दा हा असतो की तुमच्याकडे चांगले फॉलॉवर असलेले पेज असणे गरजेचे आहे. तुमचे जेवढे चांगले आणि जास्त मोठे पेज असेल तेवढे पैसे जास्त कमावू शकता. मूवी, वेब सिरीज, ऑडियो, व्हिडियो तयार करणारे तुम्हाला कॉन्टॅक्ट करून त्यांचे प्रमोशन तुमच्याकडून करवून घेतील.

Source LYFE Marketing
मग त्यांची एक पोस्ट टाकायचे किती पैसे तुम्ही घेणार हे तुमच्यावर अवलंबून असते. हा चार्ज १०० रुपयांपासून १ लाखापर्यंत असतो. फक्त तुमचे पेज असणे गरजेचे आहे. तुमचे फेसबुक पेज नसेल तर आताच नवीन फेसबुक पेज क्रिएट करून चांगला चांगला स्वतः तयार केलेला कंटेंट पोस्ट करा बघा तुम्हाला पण चांगले फॉलॉवर मिळतील.
मार्केटिंग (Marketing)
प्रत्येक क्षेत्रात मार्केटिंग ही आलीच. फक्त मार्केटिंग ही प्रत्येक भागात वेगळी असते. फेसबुकवर तुम्ही मार्केटिंग करू शकता. मग ती मार्केटिंग स्वतःची, दुसऱ्याची, कीवा कुणा मोठ्या कंपनीची असू शकेल. पण फेसबुक वर सर्वात जास्त मार्केटिंग होते ती म्हणजे Affiliate Program ची. आता तुम्ही म्हणाल नक्की ही काय भानगड आहे किंवा काहींना हे माहीत देखील असेल.
Affiliate Program मध्ये तुम्ही कोणतीही वस्तू खरेदी करण्यासाठी लोकांना प्रेरित करा. जर तुम्ही पोस्ट केलेल्या लिंक वरून कुणी खरेदी केले तर त्यामागे एक विशिष्ट ठरलेली किंमत तुम्हाला मिळेल. उदाहरणासाठी आपण Amazon Affiliate कसे काम करते ते पाहू म्हणजे तुम्हाला अंदाज येईल.
अमेझॉनवर असंख्य प्रोडक्ट आहेत. जर त्यातले काही प्रोडक्ट तुम्ही तुमच्या फॉलॉवर ना खरेदी करायला सांगितले तर त्या मागे तुम्हाला एक विशिष्ट रक्कम मिळते. जेवढे पण लोक तुमच्या लिंकवरून शॉपिंग करतील तेवढे पैसे तुमच्या अमेझॉन खात्यात जमा होतात.
एका सर्वेनुसार Affiliate मध्ये सर्वात जास्त ऑनलाईन तुम्ही पैसे कमावू शकता असे समोर आले आहे.
मित्रानो सर्व क्षेत्रात पाटीलजी मीडिया काम करत आहे. आम्ही महिन्याला ५० ते १ लाख रक्कम ऑनलाईन कमावतो. मागच्या पाच महिन्यात आम्ही ७ लाख रुपये ऑनलाईन कमावले आहेत. खाली दिलेला फोटो पाहू शकता. जर तुम्हाला सुद्धा आमची मदत हवी असेल ह्या क्षेत्रात उतरण्यासाठी तर आमच्या ह्या इमेल आयडीवर आम्हाला कॉन्टॅक्ट करा.

आम्ही योग्य दरात तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करू. जेणेकरून तुम्ही सुद्धा घरबसल्या पैसे कमावू शकता. मग वाट कसली पाहत आहात लगेच आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि आमच्याशी बोला. सध्या आमचे फेसबुकवर २२ पेज आहेत.
आमचे सोशल अकाउंट
कथा वाचायची आवड असेल तर हि कथा नक्की वाचा लॉक डाऊन आणि तिच्या आठवणी