उन्हाळा आणि हिवाळा हे दोन ऋतु सोडले तर पावसाळ्यात सगळ्यात जास्त टेन्शन असते ते कपडे सुकण्याचे. दिवसभर पाऊस पडत असल्यामुळे कपडे सुकने कठीण होऊन बसते. शिवाय जरी दोन दोन दिवसांनी कपडे सुकले तरी त्याला विचित्र वास येतो. त्यामुळे सध्या तरी घरातील स्त्रियांना ओले कपडे रोज कसे सुकावयचे हा प्रश्न पडला असेल. यावर आम्ही आज तुमच्यासाठी काही उपाय आणले आहे जेणेकरून तुमचे कपडे रोज मस्त वाळतील.
पहिली गोष्ट म्हणजे पावसाळ्यात कपडे लवकर सुकण्यासाठी पहिल्यांदा कपडे मशीन मध्ये ड्रायरला लावा. जरी मशीनमधे धुतलेले कपडे तुम्हाला आवडत नसतील तरी कपडे बाहेर धुवून नंतर ते ड्रायरला लावा. त्यामुळे तुमचे कपडे लवकर सुकतात.
तुम्ही जर कपडे थंड पाण्यात पिळत असाल तर त्यामुळे तुमचे कपडे सुकायला वेळ लागतो. त्यापेक्षा कपडे पिळायला गरम पाणी वापरा. त्यामुळे तुमचे कपडे लवकर सुकतील.
कपडे वाळत घालताना एकमेकांत थोड अंतर ठेवा. जेणेकरून त्यांच्यामध्ये हवा खेळती राहील आणि ते लवकर सुकण्यास मदत होईल.
कपड्यांना सुकल्यावर ही कुबट असा वास येतो, तो येऊ नये म्हणून कपडे धुण्याच्या पाण्यात थोड व्हिनेगर मिसळा. एखादी सुवासिक अगरबत्ती कपड्याच्या जवळ लावा पण सुरक्षित अंतर ठेऊन किंवा धूप जाळावा. नाहीतर कपाटात अगरबत्तीचा पुडा किंवा कापूर ठेवावा. किंवा सुकल्यावर लगेच इस्त्री करून ठेवत जा.
आता महत्वाची गोष्ट म्हणजे पावसाळ्यात कोणत्या प्रकारचे कपडे घालावेत जेणेकरून ते लवकर सूकतील तर सिल्क किंवा नायलॉन ह्या धाग्यांचे कपडे वापरा. हे कपडे सुकायला सोपे असतात. सुती कपडे सुकायला वेळ लागतो.
वर दिलेल्या पद्धती तुम्ही एकदा घरी नक्की वापरा. बघा पावसाळ्यात नक्कीच तुम्हाला ह्याचा फरक जाणवून येईल.
हे पण वाचा रोज न चुकता गरम पाण्यात हळद मिसळा आणि हे पाणी प्या यामुळे काय फायदे मिळतात ते पहा