कोरोना विषाणू आपले हातपाय वेगवेगळ्या राज्यात वेगाने पसरवतोय. त्यासाठी सरकारने लॉक डाऊन ३१ मे पर्यंत वाढवले आहे. महाराष्ट्र सरकारने सुद्धा काही ठिकाणी लॉक डाऊन शिथिल ठेवलं आहे तर जिथे रेड झोन परिसर आहे तिथे मात्र पूर्णतः बंदची घोषणा केली आहे. असे असताना देखील लोक बाहेर पडत आहेत. तुम्हाला जर काम असेल तरच बाहेर पडा अन्यथा परवानगी शिवाय बाहेर पडू नका.
परवानगी म्हणजे जर तुम्हाला कामानिमित्त घराबाहेर पडायचे असेल तर सरकार कडून ई पासची सुविधा आखली आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी ह्या पासचा उपयोग होतो. खूप लोक बाहेर पडण्यासाठी ह्याचा उपयोग सुद्धा करत आहेत. पण काही लोकांना ई पास कुठून मिळवावा किंवा जिथून मिळतो तिथी सारखा रीजेक्ट होतो अशा समस्या उद्भवत आहेत. आज आम्ही तुम्हाला अशी एक वेबसाईट सांगणार आहोत ज्या वेबसाईटवर एका दिवसाच्या आत तुमचे ई पासचे फॉर्म यशस्वी होईल आणि तुम्ही प्रवास करू शकता.
तुम्ही covid19.mhpolice वेबसाईटला भेट देऊन ई पास साठी अर्ज करू शकता. ही साईट ओपन केल्यानंतर तुम्हाला असे विचारण्यात येईल की तुम्ही महाराष्ट्र राज्यात किंवा इतर राज्यात प्रवास करू इच्छिता? इथे तुम्हाला होय किंवा नाही मध्ये उत्तर द्यायचे आहे. त्यानंतर नजिकचे जिल्हा पोलिस आयुक्तालय सिलेक्ट करा, तुमचे पूर्ण नाव टाका, कोणत्या तारखेपासून प्रवास करायचा ती तारीख टाका, कधी पर्यंत प्रवास करायचा आहे ती अंतिम तारीख टाका, मोबाईल क्रमांक टाका, प्रवासाचे कारण टाका म्हणजे तुम्ही का आणि कशासाठी प्रवास करत आहात? वाहनाचा प्रकारची नोंद करा म्हणजेच तुमच्याकडे कोणते वाहन आहे त्याची माहिती द्या. त्यानंतर वाहन क्रमांक टाका, सध्याचा पत्ता टाका, ईमेल आयडी द्या, प्रवास कुठून सुरू होऊन कुठे संपेल ह्याची माहिती द्या, कुणी सह प्रवाशी आहे का नाही त्याची नोंद करा, जिथे प्रवास संपणार आहे तिथला पत्ता टाका.
ही सर्व डिटेल्स भरल्यानंतर तुम्हाला तुमचा एक फोटो अपलोड करावा लागेल (फोटो साईझ २००kb पेक्षा वर नसावी). ऑर्गनायझेशन डॉक्युमेंट्सच्या ठिकाणी तुम्ही आधार कार्ड अपलोड करू शकता. डॉक्टर सर्टिफिकेट जिथे विचारतील ती जागा तशीच सोडून एकदा फॉर्म पूर्ण नीट चेक करून सबमिट बटणावर क्लिक करा. हे केल्यानंतर तुम्हाला एक टोकण नंबर मिळेल. जर तुमचे ई पास स्वीकारले असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर तुम्हाला एका दिवसाच्या आत मेसेज येईल.