Home बातमी घरबसल्या रेशन कार्ड मध्ये जोडा कुटुंबातील व्यक्तीच नाव, जाणून घ्या काय आहे पद्धत

घरबसल्या रेशन कार्ड मध्ये जोडा कुटुंबातील व्यक्तीच नाव, जाणून घ्या काय आहे पद्धत

by Patiljee
29306 views

लॉक डाऊन मध्ये सध्या रेशन कार्ड काही लोकांसाठी महत्त्वाचं काम करतेय. मोल मजुरी करून घर चालवणाऱ्या लोकांना सरकार रेशन कार्ड मार्फत रेशन देतेय. ह्या मागचे एकच महत्त्वाचे कारण आहे ते म्हणजे कुणीही निपोटी झोपला नाही पाहिजे. सध्या एक योजना प्रामुख्याने समोर येत आहे ती म्हणजे वन नेशन, वन राशन कार्ड म्हणजेच तुम्ही भारतात कोणत्याही राज्यात असला तरी तुमच्या रेशन कार्ड मार्फत रेशन घेऊ शकता. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की जर तुमच्या कुटुंबातील व्यक्तीच नाव रेशन कार्ड मध्ये नव्याने जोडायचे असेल तर कसे ऑनलाईन आणि ऑफलाईन जोडता येईल.

ह्या पद्धती मध्ये कोणत्या डॉक्युमेंटची गरज लागेल?

जर तुम्ही तुमच्या नवजात बाळाचे नाव रेशन कार्ड मध्ये जोडणार असाल तर घरातील मुख्य व्यक्तीचे रेशन कार्ड असणे गरजचे आहे. त्याच बरोबर मुलाचा जन्म दाखला आणि आई वडिलांचा आधार कार्ड असणे गरजचे आहे.

नवविवाहित मुलगी तुमच्या घरी आले आणि तिचे नाव टाकायचे असल्यास तुम्हाला त्या मुलीचा आधार कार्ड, मुलीच्या घरी असलेले रेशन कार्ड वरील कमी केलेलं तिच्या नावाची ओरिजनल कॉपी, नवऱ्याचा आधार कार्ड गरजेचा आहे. काही ठिकाणी तुमच्या कडून लग्नाचे प्रमाणपत्र सुद्धा मागितले जाते.

घरात राहून ऑनलाईन कसे कराल हे काम?

  • तुम्ही तुमच्या राज्यातील खाद्य आपूर्ति विभागची वेबसाईट सर्च करा. नंतर त्या वेबसाईटवर तुम्हाला तुमची एक आयडी बनवावी लागेल. जी बनवण्यात अत्यंत कमी वेळ लागतो.
  • तुमची आयडी बनल्यानंतर समोरच तुम्हाला नवीन सदस्याचे नाव जोडणीसाठी पर्याय मिळेल. ह्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर एक नवीन फॉर्म समोर येईल.
  • ह्या फॉर्म मध्ये त्या नवीन सदस्याची सर्व खरी खरी माहिती तुम्हाला द्यावी लागेल.
  • त्यांनतर तुमच्या जवळ असलेल्या डॉक्युमेंटची स्कॅन कॉपी तुम्हाला अपलोड करावी लागेल. आणि पुढे फॉर्म सबमिटवर क्लिक करावा लागेल.
  • तुमचा फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन क्रमांक मिळेल. हा क्रमांक तुम्हाला तुमचा फॉर्मची स्थिती चेक करण्यासाठी उपयोगी पडेल.
  • तुम्ही सबमिट केलेले फॉर्म योग्य आहे का नाही ह्याची पडताळणी अधिकारी करतात. जर माहिती त्यांना योग्य वाटली तर तुमचा फॉर्म स्वीकारला जातो. त्यानंतर तुमच्या पत्त्यावर तुम्हाला नवीन रेशन कार्ड पाठवले जाते.

ऑफलाईन हे काम कसे कराल?

जर तुम्हाला ऑनलाईन हे काम करायला जमत नसेल तर तुम्ही ऑफलाईन सुद्धा हे काम करू शकता. एका दिवसात तुमचे काम होऊन जाईल. तुमच्या तालुक्याच्या तहसील कार्यालयात जाऊन तिथल्या सेतू मधून किंवा बाजूच्या दुकानातून नाव जोडणी साठी फॉर्म घ्या. जर तुम्हाला तो फॉर्म भरता येत असेल तर तुम्ही भरू शकता अन्यथा तिथे असलेल्या व्यक्ती कडून सुद्धा तुम्ही तो फॉर्म भरू शकता.(त्यासाठी तो २० किंवा ३० रुपये तुमच्याकडून घेईल) भरलेल्या फॉर्मवर तुमची स्वाक्षरी करून तो फॉर्म संबंधित सेतू मध्ये जाऊन त्यांना सबमिट करा. तिथे बसलेला अधिकारी तुमचा फॉर्म पडताळून पाहिल. सर्व योग्य असल्यास त्या फॉर्मवर स्वाक्षरी करून पुढे पाठवण्यात येईल. तुमच्या रेशन कार्डवर तो अधिकारी नवीन व्यक्तीचे नाव वाढवून तुम्हाला देईल.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल