Home हेल्थ तीन ऋतु आहेत या तिन्ही ऋतु मध्ये तुमचा आहार कसा असावा?

तीन ऋतु आहेत या तिन्ही ऋतु मध्ये तुमचा आहार कसा असावा?

by Patiljee
1881 views

आपल्या वर्षात १२ महिने असतात. या १२ महिन्यात तीन ऋतु येतात ते कोणते तर उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा हे तीन ऋतु सर्वानाच माहीत आहेत. या तीनही ऋतुंमध्ये तुमच्या शरीराची पचन संस्था कधी मंदावते तर कधी व्यवस्थित काम करते. त्यामुळे आपण या वेगवेगळ्या ऋतु मध्ये काय खावे ते आज पाहणार आहोत जेणेकरून आपण कमी आजारी पडू.

उन्हाळा

उन्हाळा म्हटलं की वातावरणात अतिशय उष्णता असते. बाहेरील सर्व ठिकाणचे पाणी या उष्णतेने सुकते त्याचबरोबर आपल्या शरीरातील पाणी ही कमी होते. शिवाय खनिजे ही कमी होतात. आणि मग पाण्याच्या कमतरतेमुळे चक्कर येणे थकवा येणे,पोटाचे आजार, डीहायड्रेशन इतर अनेक आजार आपल्याला होऊ शकतात.

त्यासाठी पोटात जास्तीत जास्त द्रव्य पदार्थ म्हणजे लिंबू सरबत, नारळ पाणी, फळांचा रस,साधे पाणी इत्यादी योग्य प्रमाणत आपल्या शरीरात जायला हवे. त्याचप्रमाणे जास्तीत जास्त फळांचा वापर आहारात करावा. तेलकट, मसालेदार तसेच मांसाहार याचे सेवन कमी करावे. त्यामुळे तुमचे पोट व्यवस्थित काम करते.

हिवाळा

हिवाळा या ऋतूमध्ये तुम्ही असे पदार्थ ही खाऊ शकता जे पचायला जड आहेत. कारण या दिवसात वातावरणात एकदम थंडावा असतो. त्यामुळे आपली पचनशक्ती ही वाढलेली असते आणि म्हणून या दिवसात काहीही खाल्ले तरी ते सहज पचते.

म्हणून या दिवसात लोक आपले शरीर गरम राहण्यासाठी गरम पदार्थांचे सेवन करतात. या वेळेस व्यायाम करावा त्यामुळे आपल्या शरीरात गरमी निर्माण होते. डाळी, सोयाबीन आणि फळ याचे प्रमाण वाढवा. तसेच तृणधान्य म्हणजे गहू, तांदूळ, बाजरी, नाचणी, यांचा ही जास्त प्रयोग खाण्यात करावा.

पावसाळा

पावसाळा म्हटले की नेहमी पोट खराब होत असतात. कारण या दिवसात वातावरणात अनेक प्रकारचे जीव जंतू यांचा प्रसार वाढलेला असतो. शिवाय पचन संस्था ही मंदावलेली असते. यासाठी उघड्यावर असणारे म्हणजे रस्त्यावर विकायला असते माशा बसलेले पदार्थ मुळीच काही नये. पदार्थ बनवून झाल्यावर झाकून ठेवावा. पाणी ही नेहमी उकळून प्यावे.

आरोग्यविषयक अजून काही आर्टिकल वाचा.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल