सध्या सिनेमापेक्षा कलाकार रिऍलिटी शो कडे आपला मोर्चा फिरवताना दिसतात. फक्त प्रमोशन पुरते मर्यादित न राहता ते रिऍलिटी शो चे जजचे सुद्धा काम पाहतात. अशा कलाकारांची तुम्ही लिस्ट पाहिली तर खूप मोठी आहे. ह्याचे कारण सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे कारण सिनेमा पेक्षा जास्त पैसा त्यांना अशा रिऍलिटी शो पासून मिळतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही कलाकारांच्या मिळणाऱ्या मानधना बद्दल सांगणार आहोत.
करीना कपूर
करीना कपूरने डान्स इंडिया डान्स ह्या झी टीव्ही वाहिनीवरील शो साठी पहिल्यांदाच जजचे काम स्वीकारले होते. ह्या शोच्या प्रत्येक एपिसोड साठी तिला ३ करोड एवढे भरगच्च मानधन मिळत होते.
मलाईका अरोडा
आजवर मलाईका अनेक रिऍलिटी शोचे जजमेंट केलं आहे. सिनेमा पेक्षा ती रिऍलिटी शो मध्येच जास्त दिसली आहे. ती प्रत्येक एपिसोडचे एक करोड मानधन आकारते.
माधुरी दीक्षित
आपल्या अभिनयाने आणि डान्स ने सर्वांना घायाळ करून सोडणारी धक धक गर्ल माधुरीला आपण अनेक सिनेमात पाहिलेच आहे. पण तिने झलक दिखलाजा आणि डान्स के दिवाणे ह्या रिऍलिटी शोचे जजमेंट केले आहे. ती सुद्धा प्रत्येक एपिसोड १ करोड मानधन घेते.
जॅकलिन फर्नांडिस
जॅकलिनला तुम्ही अनेक सिनेमात पाहिलेच असेल
पण खूप कमी लोकांना हे माहित आहे की तिने झलक दीखलाजा पर्व ९ मध्ये जजमेंटची धुरा स्वीकारली होती. ह्या संपूर्ण पर्वात तिला ९ करोड मानधन मिळाले होते.
ऋतिक रोशन
ऋतिक नेहमीच आपल्या सिनेमात वेगळ्या भूमिका करण्यासाठी प्रसिद्ध आहे पण तुम्हाला आठवत असेल जस्ट डान्स नावाचा एक रिऍलिटी शो आला होता. त्या शोचे जजमेंट ऋतिक ने केले होते. तेव्हा त्याने प्रत्येक एपिसोड चे २ करोड मानधन घेतले होते.
सलमान खान
रिऍलिटी शो मध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या यादीत सलमान खानचे स्थान अव्वल आहे. दरवर्षी सलमान बिग बॉस शो होस्ट करत असतो. आणि प्रत्येक वर्षी त्याची फिस वाढत जाते. यावर्षी त्याने एका एपिसोड साठी १३ करोड एवढी भलीमोठी रक्कम मानधन म्हणून घेतली होती. ह्या संपूर्ण सिझन मध्ये त्याने २०० करोडच्या वर कमाई केली होती.
शाहरुख खान टेड टॉकच्या १० एपिसोड साठी १० करोड, कौन बनेगा करोडपती साठी अमिताभ बच्चन प्रत्येक एपिसोड २.५ ते ३ करोड, खतरों के खिलाडी साठी अक्षय कुमार १.६५ करोड, सोनाक्षी सिन्हा इंडियन आयडॉल ज्युनियर १ करोड एवढे मानधन आकारतात. (दिली गेलेली मानध नाची रक्कम इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे दिली आहे.)