लॉक डाऊन हळूहळू सर्व ठिकाणी शिथिल होतोय. त्यामुळे सर्वच क्षेत्र हळूहळू ग्राहकांसाठी खुले होत आहेत. एकमात्र नक्की आहे की जरी कोरोना देशातून हद्दपार झाला तरी त्याचा प्रभाव सर्वच क्षेत्रावर असेल. अनेक नव्या गोष्टी, नवे नियम आमलात आणण्यात येतील. ह्यातलाच एक नवीन नियम हॉटेल क्षेत्रात सुरू झाला आहे.
हॉटेल क्षेत्रातील नियम नक्की काय आहे?
तुम्ही हॉटेलमध्ये गेल्यावर कोणतीही गोष्ट ऑर्डर करताना आधी मेनू कार्ड पडताळून पाहता. त्या मेनू कार्डमध्ये पदार्थाचे नाव आणि किंमती दिलेल्या असतात. पण आता नव्या नियमानुसार मोठमोठ्या हॉटेलमध्ये तुम्हाला मेनू कार्ड मध्येच जेवणाच्या पदार्थासमोर त्याच्या पोषण वैल्यूची सुद्धा माहिती असेल.

असे पहिल्यांदाच घडणार आहे मी एखाद्या शिजवलेल्या पदार्थाची पोषण वैल्यू तुम्हाला मेनू कार्ड मध्येच दिसेल. हा निर्णय फूड सेफ्टी एंड स्टैंडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया (एफएसएसएआई) ह्यांनी आपल्या ईट राइट इनीशिएटिवच्या अंतर्गत हा नियम लागू केला आहे.
हा नियम सर्वच हॉटेलमध्ये सुरू केला तर लोकांना नक्कीच ते फायद्याचे ठरेल. लोकांचे स्वास्थ चांगले राहण्यासाठी त्यांना चांगले जेवण मिळणे गरजचे आहे. पोटात गेलेले अन्न आपल्या शरीरासाठी किती फायद्याचे आहे हे जर आधीच आपल्याला कळले तर आपण योग्य पदार्थाची निवड करू शकतो. हा ह्या मागचा मुख्य उद्देश आहे.
तुम्हाला काय वाटतं मित्र मैत्रिणींनो की ह्या हॉटेल क्षेत्रातील नियमाचा काटेकोर पणे पालन होईल की हा नियम सुद्धा असाच पडून राहील. आम्हाला तुमचे मत नक्की कळवा.
हे सुद्धा वाचा
एअरटेल ऑफर तुमच्यासाठी, फ्री मध्ये दोन जिबी डाटा