आपल्या घरात सतत भिंतीवर दिसणारी पाल पाहून नेहमीच आपल्या कपाळावर आठया येतात. पण तिचे खाद्य हे आपल्या घरातच लपलेले असते. लहान पाखरे आणि कीटक हे तिचे खाणे असते. तसेच पाल ओरडायला लागली की तिचा आवाज चुकचुक असा येतो. तसेच पालीची शेपटी सहज तुटणारी शेपटी एखाद वेळी तुटल्यास पुन्हा परत येते कधी कधी संकटकाळी पाल स्वतच्या मर्जीने स्वत:ची शेपटी तोडून घेते. पण अशी ही पाल थंडीच्या दिवसात मात्र अचानक गायब झालेली दिसून येते. याला कारण काय आहे हे तुम्हाला माहीत नसेल म्हणून आज आम्ही याबाबत तुम्हाला सांगणार आहोत.
तर मित्रानो थंडीच्या दिवसांमध्ये कितीतरी असे प्राणी आहेत जे आपल्याला दिसत नाही. का तर ते आपले जीवन थंडीपासून वाचवण्यासाठी सुरक्षित जागी लपलेले असतात. अशाच प्रकारे पालीचेही आहे. तर मित्रानो सगळ्याच सस्तन प्राण्यांचे शारीरिक तापमान हे निश्चित असते कारण त्यांची चयापचय क्रिया ही नेहमी व्यवस्थित काम करत असते पण उभयचर आणि सरपटनाऱ्या प्राण्याचे तसे नसते त्यामुळे त्यांना जास्त गरमी किंवा जास्त थंडी सहन होत नाही.
त्यामुळे अशा वातावरणात आपला जीव वाचवण्यासाठी हे प्राणी कोणत्याही बोलत किंवा भिंतीच्या फटीमधे जाऊन लपतात. त्यामुळे त्यांची ऊर्जा उत्सर्जित होत नाही त्यामुळे त्यांना भूक लागत नाही आणि यापुढे जाऊन त्यांना आपल्या खाण्याची पिण्याची तयारी करावी लागत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त वेळ या काळात आपल्या शरीराचे रक्षण करण्यासाठी त्या प्रत्येक ऋतूमध्ये तयार असतात.
तसेच पाल ही थंड रक्ताची असते त्यामुळे तिच्या शरीराच्या अंतर्गत गरमी नसते त्यामुळे जास्त थंडी असल्यास पाल शांत असते. मात्र, तिच्या शरीरात साल्मोनेल्ला, लिस्टेरिया, एश्चेरिकिया कोलाय यांसारखे जीवाणू असतात. शिजविलेल्या अन्नात पाल पडली की तिच्या शरीरातील जीवाणूंमुळे अन्न दूषित होते. असे दूषित अन्न खाल्ल्याने मनुष्याला विषबाधा होते.