हिरकणी सिनेमाने आपल्या प्रत्येकाच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले. आपण लहापणापासून जो इतिहास वाचत आलोत तोच इतिहास जेव्हा रुपेरी पडद्यावर पाहताना मन अतिशय भारावून गेले. प्रसाद ओक दिग्दर्शित ह्या सिनेमात प्रत्येक कलाकाराने आपल्या अभिनयाने एक दबदबा निर्माण केला होता. ह्याच सिनेमात हिरकणीच्या नवऱ्याची भूमिका करणाऱ्या अमित खेडेकर सुद्धा आपली एक वेगळी ओळख प्रेक्षकांना निर्माण करून दिली. त्याच ते कॅमेरासमोर वावरण, भारदस्त शरीर, एखाद्या हिरोला साजेल अशी उंची, अगदीच सर्वच गोष्टीत तो भाव खाऊन गेला.
पण तुम्हाला माहिती आहे का अमित खेडेकर ह्याची पत्नी कोण आहे? तुम्ही तिला अनेक सीरियल मधून पाहिलीच असेल. तीच नाव आहे रश्मी अनपट खेडेकर. तुम्ही ह्या आधी तिला अवताराची गोष्ट ह्या सिनेमात आणि कुलस्वामिनी आणि फ्रेशर ह्या मालिकांमधून पाहिलेच असेल. स्टार प्रवाहातील अग्निहोत्र २ ह्या मालिकेत सुद्धा ती आता मुख्य भूमिका करत आहे. त्यांच्या लग्नाला सात वर्ष पूर्ण झाली असून त्यांना एक गोंडस बाळ सुद्धा आहे. ह्या दोघांनीही पुढचं पाऊल ह्या मालिकेत एकत्र काम केले होत.

अमितला तुम्ही झी युवा वरील गर्ल्स हॉस्टेल ह्या मालिकेत सुद्धा पाहिले असेल. त्यामुळे हे दांपत्य आपल्यासाठी नक्कीच नवीन नाहीयेत. पण खूप कमी लोकांना माहिती आहे की हे नवरा बायको आहेत. म्हणून आज आम्ही तुमच्यासमोर ही बातमी आणली. तुमच्यापैकी कुणाला हे माहीत होत आधी आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.