जेवणामध्ये प्रत्येकालाच हिंग घातलेले आवडते असे नाही पण काहींना हिंगाची फोडणी दिल्याशिवाय जेवणच बनले जात नाही अशी ही लोक आहेत. तसे बघितले तर हिंगाची फायदे अनेक आहेत. हिंग काही लोकं मसाल्यात ठेवतात म्हणजे हिंगाचे खडे यामुळे मसाला खराब होत नाही. हिंगाचा समावेश आपल्या आहारात होणे गरजेचे आहे, पण आज आपण हिंग नेमका कसा तयार केला जातो हे बघुयात.
हिंग बनविण्यासाठी एक वनस्पतीचा वापर होत असतो. तिचे नाव आहे फेरुल फोइटिडा वनस्पतीचे नाव आहे. हे बहुतेक जणांना माहीत नसेल. ही वनस्पती भारतात काश्मीर आणि पंजाब मधील काही भागांत आढळते. तसे बघायला गेले तर कोणत्याही मोसमात हा पीक येतो. हिंग हे त्या वनस्पतीच्या मुळाचा रस काढून तो सुकवतात, त्यापासून हींगाचे खडे मिळतात. हिंगाचा झाड वाढीला खूप मोठं होत. तसा हिंग खाल्यास त्याचा वास लसूण सारखा लागतो. पण भाजीमध्ये वापरल्यास भाजीची चव आणखी वाढते.
हिंग मध्ये अनेक औषधी गुण असतात. एंटीवायरल, एंटीबायोटिक, एंटीऑक्सिडेंट, मूत्रवर्धक आणि एंटी-कार्सिनोजेनिक असते. हिंगाचा खोकला झाला असेल तर खूप उपयोग होतो. गरम पाण्यासोबत चिमूटभर भाजलेले हिंग मिसळा आणि घ्या. त्यामुळे तुमचा खोकला आणि कफ कमी होतो. तुमच्या दातामधे दुखत असते तरीही हिंगाचा उपयोग होतो. यासाठी दुखत असलेल्या ठिकाणी हिंग ठेवा आराम मिळेल. तसेच पोटात गॅस झाला असेल तर थोडा हिंग टाकत टाकून हे ताक प्या. काही लोकांना उचकी खूप वेळा लागते अशा वेळी हिंगाचा उपयोग होतो.