बॉलिवुड, साऊथ आणि मराठी मध्ये नावाजलेले अभिनेते म्हणून महेश मांजरेकर यांची ओळख आहे. मराठी बिग बॉस होस्ट करणारा हा अभिनेता आता आपल्या मुलीची ओळख जगाला करण्यासाठी तीला या फिल्म इंडस्ट्रीमध्ये येऊ दिलं आहे. सई हिने लहान असल्यापासून बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली होती. त्यातील एक म्हणजे 2005 मधील विरूद्ध सिनेमा पासून तिने सिनेसृष्टीत प्रवेश केला होता. त्यानंतर तिने मराठी सिनेमा काकस्पर्श यातही बालकलाकार म्हणून काम केले होते.

शिवाय ती इथेच न थांबता बॉलिवुडमध्ये दबंग ३ सिनेमात सलमानची नायिका म्हणून आपल्याला पाहायला मिळालीच आहे. यातील तिचा अभिनय पाहून सर्व प्रेक्षकांच्या मनात आपली जागा तीने चांगलीच वठवली आहे. या सिनेमातील अभिनय मुले ती लोकांच्या अतिशय पसंतीस उतरली आहे. पिढीजात अभिनायचा वारसा जरी वडिलांकडून मिळाला असला तरी लोकांचे मन जिंकण्याचे काम तिने स्वतः केले आहे. जरी वडिलांच्या ओलखीवर तिला सिनेमात काम मिळत असले तरी पुढचा सगळा भार तिच्यावर आहे. लोकांचे मन जिंकायचे कसे हे तिचे तिला करायचे आहे. ज्याप्रमाणे तिला दबंग 3 मध्ये सलमान सोबत काम करायचं होत त्यावेळी तिला थोड अंगावर भार असल्यासारखे वाटायचे.
कारण इतक्या मोठ्या सुपरस्टार सोबत काम करायचे म्हणजे खायची गोष्ट नव्हती. शूटिंग करताना सलमान आणि प्रभू देवा यांनी तिला खूप समजून घेतले हे ती सांगायला विसरली नाही. दबंग ३ सिनेमा हिट झाल्यानंतर अनेक चित्रपटांची तिच्याकडे ऑफर आली आहे. योग्य कथा निवडून मी पुढे काम करेल असेही तिने एका मुलाखतीत सांगितले.त्यामुळे सलमान खानच्या ह्या दबंग ३ सिनेमाने सईला रातोरात स्टार केले ह्यात काही शंका नाही.