घर एक स्वप्न असते ते तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनात वसलेले असते. कोणी घरासाठी आयुष्यभर पैसा जोडत असतो तर कोणाला त्यांच्या आज्या पंज्याकडून मिळालेली देणगी असते. पण ज्याच्याकडे घर नसते त्याला कळते ती घराची किंमत कारण घर असेल तर सर्व आहे म्हणून स्वतःचे घर असणे हे एक स्वप्न आहे आणि ते पूर्ण करणे प्रत्येकाचं कर्तव्य असते.
पण आज आम्ही तुम्हाला अशा काही घरांबद्दल सांगणार आहोत ज्या बंगल्यांची किंमत करोडो रुपये आहे यातील काही बंगले असे आहेत हे विदेशात ही फेमस आहेत. तर आज आम्ही तुम्हाला काही अशा लोकांबद्दल सांगणार आहोत ज्यांचे घर हे कुठल्या महालाशिवाय कमी नाही. खर ते या लोकांना हे घर सहजासहजी मिळालेले नाही तर त्यासाठी त्या लोकांनी खूप कष्ट घेतले आहेत आणि म्हणून आज त्याच्याकडे आहेत इतके महाग घर तर बघुया कोणकोणते घर आहेत ते.
अंबानी हाउस
संपूर्ण जगात सगळ्यात महाग बंगल्यात हा ही बंगला आहे. या बंगल्याचे नाव एंटीला आहे आणि या बंगल्यांची किंमत जवळ जवळ 10 हजार कोटी रुपये इतकी आहे. तसेच या घरात हेलीपेड, जिम, सिनेमाघर आणि अशा खूप सोयी सुविधा आहेत या घरात पाच लोक राहतात पण त्यासाठी तब्बल 600 नोकर काम करायला आहेत. यांच्या बंगल्याला 27 मजले आहेत त्यातील 6 मजले फक्त गाड्याची पार्किंग साठी ठेवलेले आहेत.
मन्नत बंगला
बॉलिवुड मधील किंग खान शाहरुख खान आपल्या स्वबळावर इतपर्यंत पोचलेला आहे. शाहरुख आज 150 करोड रुपयांच्या बंगल्याचा मालक आहे त्याच्या बंगल्याचे नाव आहे मन्नत. तसे बघायला गेलो तर मन्नत कोणत्या जन्नत पेक्षा कमी नाही. एकाहून एक वरचढ अशा रॉयल वस्तू याच्या इंटरियलसाठी वापरल्या आहेत. फिरायला आलेल्या लोकांसाठी टुरिस्ट बंगला म्हणून ओळखला जातो. शाहरुख खानच्या बंगल्यामध्ये ऑफिस प्लेस, बॉक्सिंग रिंग, मिनी थिएटर, स्टूडियो आणि टेबिल टेनिस कोर्ट ही आहे. हा बंगला पाहण्यासाठी इथे नेहमी लोकांची गर्दी असते.
जिंदल बंगला
यावेळी काँग्रेस पार्टीचे नेता आणि जिंदल स्टील एंड पॉवर लिमिटेड के चेयरमैन नवीन जिंदल यांचा बंगला दिल्लीतील पॉश भागात आहे. हा बंगला खूप सुंदर आणि या बंगल्याला दिल्लीमधील सगळ्यात महाग बंगला म्हणतात. सुमारे तीन एकरं मध्ये तयार झालेला बंगला याची किंमत130 कोटी इतकी आहे.
रतन टाटा बंगला
टाटा ग्रुप ऑफ चे पूर्व चेयरमैन रतन टाटा नाव तर तुम्हाला माहीतच असेल याचा बंगला बघायला खूप सुंदर आणि वेगळ्या पद्धतीने बनवलेला आहे जवळ जवळ 140 कोटी रुपये खर्च करून हा बंगला बांधला आहे याचे लोकेशन समुद्र किनाऱ्यावर आहे.
अंबानी चां बंगला
धीरूभाई अंबानी यांचा छोटा मुलगा अनिल अंबानी यांचा बंगला ही जवळ जवळ 10 कोटी रुपयांचा आहे मुंबई मध्ये पाली हील मध्ये असणारा हा बंगला मुंबई मधील आलिशान बंगल्यामध्ये याचा ही सहभाग आहे.