आपल्या भारतात अनेक ठिकाणे अशी आहेत जी आपली स्वतः ची एक वेगळी ओळख निर्माण करून आहेत. अशाच काही पाच गावांबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
मलाणा गाव हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्यातील सर्वात दुर्गम भागातील हे गाव आहे ज्याचे नाव मलाना आहे. तुम्ही ह्या गावाला भारतातील सगळ्यात रहस्यमयी गाव ही म्हणू शकता. तुम्ही या गावात जाऊन कोणत्याही वस्तूला स्पर्श केले तर तुम्हाला 1000 हजार रुपयांचा दंड भरावा लागेल असे म्हणतात की येथे सिकंदरच्या सैनिकाचे वंश आहेत शिवाय इथे कोणताही भारतीय कायदा मान्य नाही या गावात स्वतची अशी संसद आहे जी सगळे निर्णय घेते. संपूर्ण भारतातील एक असा गाव आहे तिथेच फक्त मुग़ल सम्राट याची देवासमान पूजा केली जाते.
- मत्तूर गाव
या गावात प्रत्येकाने हा संस्कृत भाषा बोलत आहे. कर्नाटक मधील हा छोटासा गाव आहे जिथं फक्त हीच भाषा बोलली जाते. या गावचे नाव मत्तुर आहे जे तुम तुंग नदीच्या काठावर वसलेले आहे. या गावात प्राचीन काळापासून संस्कृत बोलली जात आहे तसेच या ठिकाणी कोणत्याही धर्माचा आणि समाजाचा भाषेवर कोणताही अधिकार नाही आहे. म्हणून गावातील मुस्लिम लोक ही अन्य लोकांप्रमाणे संस्कृत बोलत आहेत.
- कोडिन्ही गाव
ह्या गावाला जुळे गाव या नावाने ही लोक बोलतात केरळ च्या मल्लापुरम जिल्ह्यामधे हे गाव आहे या गावात 45 जुळीची मुले जन्माला येतात. हा गाव मुस्लिम लोकांचा आहे इथे गेल्यावर तुम्हाला अनेक जुळीची मुले रस्त्यावर खेळताना दिसतील.
- ढोकरा गाव
गुजरात मधील हे एक असे गाव आहे जिथे वेगळीच परंपरा चालू आहे या गावात दूध आणि दुधापासून बनवलेले समान हे गावातल्या लोकांना विकत नाही ही परंपरा कितीतरी काळापासून चालू आहे. या गावात ज्यांच्याकडे गाय किंवा म्हशी नाहीत त्याच्या घरात रोज फ्री मध्ये दूध दिले जाते.
- शनि सिंगनापुर
महाराष्ट्र राज्यातील अहमद नगर जिल्यातील नेवासा तालुक्यातील शनि शिंगणापूर हे गाव आहे. या गावात लोकांच्या घराला एकही दरवाजा मिळणार नाही इथे कोणीही आपल्या किमती दागिने किंवा वस्तूंना लॉक करत नाहीत आणि तरीही अजुनपर्यंत या गावात एकही चोरी झालेली नाही हे गाव शनि देवाच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे या गावात म्हणतात की शनि देव प्रसन्न आहे आणि जर का कोणी या गावात चोरी केली तर मात्र शनि देवाच्या प्रकोपा पासून ती व्यक्ती वाचू शकत नाही अशी येथील लोकांची भक्ती आहे शिवाय या गावाला राम राज्य या नावाने ओळखले जाते.