२०१९ मध्ये अनेक खेळाडूंनी आपल्या लग्नाची गाठ बांधली आहे. तसेच येणाऱ्या २०२० मध्ये सुद्धा अनेक खेळाडूंनी लग्न होताना आपल्याला पाहायला मिळतील. ह्यात आणखी एका खेळाडूंची भर पडली आहे. वेस्ट इंडिज संघाचा विस्फोटक फलंदाज शिमरॉन हेटमायर हा लवकर बोहल्यावर चढणार आहे. नाताळच्या दिवशी त्याने सोशल साईडवर एका अंगठीचा फोटो पोस्ट केला आणि त्याखाली लिहले होते की ती आज मला लग्नासाठी हो म्हटली. काहींच्या मते त्यांनी साखरपुडा केला आहे अशी बातमी सुद्धा पसरत आहे. पण अजुन असे कोणतेच फोटो समोर न आल्याने खर काही ते समोर आले नाहीये.
भारताविरुद्ध झालेल्या मागील काही सामन्यात शिमरॉन हेटमायर चांगला खेळ करून अनेकांचे लक्ष आपल्याकडे वळवण्यास भाग पाडले. ह्याचाच फायदा त्याला आयपीएल २०२० च्या लिलावात झाला. दिल्लीच्या संघाने त्याला करोडो रुपयाची बोली लावून आपल्या संघात घेतले त्यामुळे आता हेटमायर तुम्हाला दिल्ली संघाच्या जर्सित दिसणार आहे. हेटमयर नेहमीच आपल्या प्रेयसी मुले चर्चेत आला आहे. त्याच्या प्रेयसीचे नाव निरवानी उमराव आहे आणि हे दोघेही एकमेकांना अनेक वर्ष डेट करत आहेत.

निरवानी दिसायला खूप सुंदर असल्यामुळे नेहमीच ती सोशल मीडियावर चर्चेत राहिली आहे. तिचे सुंदर फोटो पाहून चाहते घायाळ होऊन जातात. ह्याचेच कारण असे की हेटमायर स्वतःच्या पोस्ट पेक्षा प्रेयसीसोबत असलेल्या फोटोमध्ये नेहमी चर्चेत असतो. हे दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत त्यामुळे त्यांना शुभेच्छा द्यायला विसरू नका.