Home संग्रह पुण्याच्या या महिलेने आयुष्यात एकदाही विजेचा वापर केला नाही, वाचा त्यांच्याबद्दल

पुण्याच्या या महिलेने आयुष्यात एकदाही विजेचा वापर केला नाही, वाचा त्यांच्याबद्दल

by Patiljee
7851 views

मित्रांनो आपल्याला सध्या विजेची इतकी सवय झालेली आहे की दिवसातून निदान काही मिनिटे वीज गेली तरी नको असते. कारण आपल्या रोजच्या जीवनातील गरजेच्या वस्तू ज्या आपण ठरवलेल्या आहेत त्या म्हणजे टीव्ही, फ्रीज, मोबाईल, पंखा, एसी, कूलर, वॉशिंग मशीन, ट्यूब लाईट, हिटर आणि मायक्रोवेव इत्यादी वस्तू या लाईट शिवाय तर चालूच शकत नाही. आपण या वस्तू शिवाय राहू शकत नाही त्यासाठी लागते ती म्हणजे लाईट पण ही लाईट न वापरता तुम्ही एक दिवस तरी राहू शकता का? मुळीच नाही पण अख्खं आयुष्य या महिलेने विना लाईट शिवाय काढले आहे बघा त्या आहेत तरी कोण?

ह्या आहेत पुण्यातील एक वनस्पती तज्ज्ञ अर्थातच त्यांना निसर्गाची जास्त आवड आहेच. शिवाय त्यांनी इतिहासाचा ही अभ्यास केला आहे. त्यांचं नाव आहे हेमा साने यांनी १९६० पासून आपल्या घरात विजेचा वापरच केला नाही. त्या पुण्यात कुठे राहतात तर जोगेश्वरी बोळाजवळच्या शीतलादेवीचा पार म्हणजे जुना आणि पडक्या वाड्यात त्या राहत आहेत. याचबरोबर त्यांना प्राण्यांची ही आवड आहे त्यामुळे त्यांच्यासोबत काही प्राणी आणि पक्षी ही राहतात. मांजर, मुंगूस, घुबड, साळुंकी नाचन हे सुध्दा त्या महिलेसोबत आनंदाने राहतात.

त्या पुण्यातील आबासाहेब गरवारे कॉलेजच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या त्या प्रमुख होत्या. तेव्हा त्यांनी नोकरीच्या शेवटच्या दहा वर्षात एक लूना हे वाहन वापरले होते, याशिवाय त्यांच्या आयुष्यात त्यांनी कोणत्याच विजेवर चालणाऱ्या वस्तू वापरल्या नाहीत. दिवसाच्या उजेडातच त्यांनी वनस्पती शास्त्राची काही पुस्तके लिहली आहेत. याशिवाय त्यांना जवळच कुठे जायचे असेल तर त्या पायीच जातात.

आजच्या काळात जरी निसर्गावर काही लोकांचे प्रेम असले तरी प्रत्यक्ष मात्र त्यांना बदलत्या जगाची समरस व्हायला आवडते पण हेमा ताईंनी निसर्गाशी एकरूप होऊन त्यांनी विज्ञानावर मात केली आहे. विजेचा कोणताच वापर न करता. दिवसभर नैसर्गिक उजेड खूप असतो आणि त्याच वेळात आपण जे काय वाचन किंवा उजेडात करावयाची कामे असतात ती आपण करूच शकतो ना.

मात्र सध्या तरी त्या सौऊर्जेवर चालणार दिवा वापरत आहेत. शिवाय आता सध्या रॉकेल मिळत नाही. त्यामुळे त्यांनी सध्या गॅसवर जेवण बनवतात पण ते ही कमीच करतात. रॉकेल असता तर त्यांना गॅसची गरजच पडली नसती. त्यांना आपल्या या राहणीमानाचा कसलाच पच्छाताप होत नाही. कारण त्यांचे मत आहे की, पूर्वीचे लोक असेच जीवन जगत होते त्यांचे लाईट शिवाय काहीच बिघडत नव्हते.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल