तुम्हाला लसूण निसण्याचा कंटाळा येत असेल तर अशावेळी तव्यावर हा लसूण थोडा गरम करा म्हणजे त्याच्या सालि लवकर आणि सहज निघतात.
नुडल्स करताना उकळल्यावर लगेच थंड पाण्याने धुवून घ्यव्यात त्यांना वरून तेल चोळावे त्यामुळे त्या चिकट होत नाही.
भेंड्याची भाजी बनवताना चिकट होता असेल तर त्यात थोड लिंबू पिळा किंवा भेंडी अगोदर भाजून घ्या.
चहा पावडरचा चोथा फेकून न देता तो चांगला धुवून झाडाच्या बुंध्याशी पसरवा झाडाला चांगले खत मिळते.
जेव्हा काहीं पदार्थ टाळायचा असतो किंवा पुऱ्या तळा याच्या असतात तेव्हा पुरीला जास्त तेल पकडू नये म्हणजे तेलकट होऊ नये यासाठी त्या तेलात थोड मीठ टाकावं.
आले लसूण पेस्ट जास्त दिवस टिकवायची असेल अशा वेळी ही पेस्ट वाटताना त्यात पाणी न टाकता त्यात तेल टाकावे.
स्वयंपाक घरात जेवण करताना काही चिकट पदार्थ सांडला असेल तो निघत नसेल तर त्यावर ब्लिचिंग पावडर टाकून घासून काढावा.
कारली मीठ टाकून चांगली चुरून घ्यावी आणि त्याचा रस पिळून काढावा त्यामुळे भाजी कडू नाय होत.
लिंबाचा रस कमी प्रमाणत निघत असेल तर अशा वेळी लिंबू गरम पाण्यात थोडा वेळ ठेवावा नंतर कापावा चांगला रस निघतो.
तुमच्या मिक्सर च्या भांड्यांची ब्लेड काम नीट करत नसेल तर तिला धार येण्यासाठी त्यात मीठ टाकून ते फिरवा.
पनीर भाजीमध्ये टाकल्यावर कडकं होत असतील तर अशा वेळी पनीर तळल्यावर लगेच पाण्यात सोडा.
तुमची इडली चांगली नरम होण्यासाठी त्याच्या मध्ये थोड शिजवलेला भात मिसळून वाटा इडली छान होते करून पाहा.
सफरचंद कापून ठेवल्यावर तो नेहमी काळा पडतो त्यामुळे त्याच्यावर थोड लिंबू चोळा सफरचंद काळा नाही पडणार.
हिरव्या भाज्या शिजवताना त्यां त चिमुटभर साखर टाका त्यामुळे त्यांचा रंग बदलणार नाही.
कांदा कापताना डोळ्यातून पाणी येतो अशा वेळी एका कांद्याच्या दोन फोडी करून त्यात पाण्यात ठेवाव्या.
तांदूळ शिजवताना त्यात थोड तेल आणि लिंबाचा रस टाका त्यामुळे भात चिकट होणार नाही.