Home करमणूक वय झाले तरी अजूनही प्रेक्षक ह्यांच्या सिनेमाची वाट पाहत असतात, नंबर एक वाचून धक्का बसेल

वय झाले तरी अजूनही प्रेक्षक ह्यांच्या सिनेमाची वाट पाहत असतात, नंबर एक वाचून धक्का बसेल

by Patiljee
403 views

कोणतेही मुलं हे आईच्या पोटातून बाहेर पडल्यावर लगेच त्याची कर्तबगारी सिद्ध करत नाही तर त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. अशी मेहनत की त्यासाठी लोकांनी प्रशंसा करायला हवी. आपल्या सिने जगतातील असेच काही अभिनेते आहेत ज्यांनी आपल्या तरुणपणी ही चित्रपट केले शिवाय ते आता वय झालेले असले तरी अजूनही चित्रपट करत आहेत. कोणते आहेत हे अभिनेते पाहूया.

अक्षय कुमार
बॉलिवुड मधील खिलाडी या नावाने ओळखला जाणारा अभिनेता म्हणून अक्षय कुमार आताही तितकाच फेमस आहे. अक्षय कुमारचे वय ५२ झालेले असले तरीही त्यांचे चित्रपट पाहण्यासाठी लोक आसुसलेले असतात. आजपर्यंत त्यांनी 125 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. शिवाय इतकं वय झाल्यानंतरही त्याच्या शरीरातील तरुणाई अजूनही जिवंत आहे ते वर्षातुन कमीत कमी तीन चित्रपट करत असतात.

सलमान खान
सलमान खान यांनी जसे जवानी मध्ये सिनेमे केले तसेच आताही करत आहेत सलमान यांनी 1988 साली आपला पहिला सिनेमा “बीवी होतो एैसी” यातून सिनेमा सृष्टीत प्रवेश केला होता हा त्यांचा पहिला सिनेमा होता यांची आई ही मराठी आहे आणि लोकांच्या आनंदासाठी सुपरहिट सिनेमे बनवत आहे त्याचे वय आता ५४ झालेले आहे तरीही शरीराने फिट आहे हा अभिनेता. या अभिनेत्याच्या बाबतीत जितके बोलू तितके कमीच आहे.

रजनीकांत
आता रजणीकांत चे घ्या इतकं वय झाले तरीही अजूनही साऊथ मध्ये सुपरहिट ठरणारा अभिनेता वयाने जरी म्हातारे झाले असले तरी प्रेक्षकांच्या नजरेत अजूनही ते हिरोच आहेत आणि राहणार आहेत. रजनीकांत याची लोकप्रियता इतकी आहे की लोक त्याला देव मानतात. या अभिनेत्याचे वय आता ६९ वर्षे इतके झाले आहे.

अमिताभ बच्चन
अमिताभ बच्चन यांचा आवाज आजही आपल्याला आवडतो अमिताभ बच्चन यांनी आपल्या तरुणाईत असताना ही खूप सारे हिट चित्रपट दिले तसेच ते आताही उत्तम प्रकारे चित्रपटात काम करताना दिसतात. सिनेमा जगात पाय ठेवण्या अगोदर त्यांनी ऑल इंडिया रेडिओ मध्ये काम करायचे ठरवले होते पण त्या ठिकाणी त्यांना नकार देण्यात आला होता त्यांचे वय हे 77 वर्षे झालेले आहे.

मोहनलाल
साऊथ मधील सुपर हिट ठरलेला हा अभिनेता तसेच निर्माता आहे. वयाने जरी म्हातारा होत चालला असला तरी अजूनही तो प्रेक्षकांच्या मनावर आपले स्थान टिकवून आहे. त्यांचे वय ५९ आहे. चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार या अभिनेत्याला मिळाले आहेत आणि एक सर्वश्रेष्ठ फिल्म पुरस्कार मिळाला आहे. तसेच अजूनही पुरस्कार मिळाले आहेत. त्याचप्रमाणे त्यांना पद्मश्री या नावाने ही पुरस्कृत केले आहे. ह्यांचा नवीन सिनेमा म्हणजे लोकांसाठी सण उत्सव.

Source Google

ह्या कलाकारांपैकी तुमच्या आवडीचा कलाकार कोण आहे हे आम्हाला कमेंट करून कळवा.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल