बांगड्या हे सुध्दा मंगळसूत्र प्रमाणे सौभाग्याचे अलंकार म्हणून मानले जाते. त्यामुळे लग्नाच्या काही दिवस अगोदर स्त्रियांना हिरवा चुडा भरला जातो. त्याला वज्रचुडा असे म्हणतात. पण तरीही स्त्री ही जन्मापासूनच बांगड्या घालत आलेली आहे. त्यामुळे बांगड्या घालण्यासाठी ती सुवासिनी असणे आवश्यक नाही. पूर्वीच्या काळात स्त्रिया हातात काकण घालायच्या, बांगड्या घातल्यामुळे स्त्रियांचे हात दिसायला आकर्षक दिसतात आणि भरलेल्या चुड्या मुळे त्या दिसायला ही सुंदर दिसतात.
आताच्या काळात स्त्रिया बांगड्या घालत नाहीत. त्यामुळे त्यांना लवकर थकवा जाणवत असतो. जुन्या काळात स्त्रिया हातभार बांगड्या भरायच्या आणि तितकेच अवजड काम ही त्या करायच्या. शेती, घरातील सर्व कामे करूनही त्यांच्या चेहऱ्यावर थकवा अजिबात दिसायचा नाही. कारण त्यांनी काही गोष्टी या संस्कृतीनुसार आत्मसात केल्या होत्या. हातभार बांगड्या घातल्याने त्या बांगड्या काम करताना एकमेकांना घासल्या जायच्या आणि त्यामुळे मनगटात रक्तसंचार योग्य रीतीने होत असतो.
त्यातून उर्जा निर्मिती होते आणि म्हणून थकवा येत नाही. शिवाय बांगड्या घातल्याने आपली मानसिक स्थिती ही उत्तम राहते. रक्तदाब कमी-जास्त होणे यावर या बांगड्यांचा अनुकूल परिणाम होतो. स्त्रियांना प्रसव यातना सहन करण्याची ताकद ही बांगड्यामधून मिळत असते. शिवाय रोजच्या आयुष्यात अनेकांच्या शरीरामध्ये हार्मोन्सची असंतुलित होणे वाढले आहे. यावर ही बांगड्या घातल्यामुळे हार्मोन्स संतुलित राहतात. बांगड्या काचेच्या घाला किंवा धातूच्या त्यातून तुम्हाला उत्तमच फायदा मिळत असतो.
पहीलेच्या काळात घरात बांगड्यांचा आवाज आला तर समजायचे स्त्रियांचा वावर घरात आहे पण आताच्या काळात ते शोधूनही सापडणार नाही. गावा ठिकाणी काही स्त्रिया या बांगड्या घालताना आताही दिसतात पण शहरामध्ये ह्या संस्कृतीचा वारसा संपुष्टात आला आहे. आपणच आपली संस्कृती जपायला हवी. तुम्हाला अजूनही आठवत असेल तुमची आजी किंवा आई नक्कीच अशा बांगड्या घालत असायच्या मग तुम्हीही त्या नक्कीच घालू शकता.