बॉलीवुड इंडस्ट्री ही एक मायानगरी आहे. इथे मोठ्या पडद्यावर दिसण्यासाठी अनेक कलाकार रोज ह्या मायानगरीत प्रवेश करत असतात. पण ह्यात सर्वानाच ही संधी मिळत नाही. काही आपल्या मेहनतीच्या जोरावर टिकून राहतात तर काही रोजच्या स्ट्रुगल कंटाळून परतीचा प्रवास करतात. बॉलिवुडमध्ये अनेक असे कलाकार आहेत जे अतिशय दुर्गम भागातून आले आहेत. त्यांना ह्या इंडस्ट्रीमध्ये कुणीही गॉड फादर नव्हता तरी सुद्धा त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. अनेक कलाकार चित्रपट करतात आणि लाखो करोडो रुपये कमवत असतात पण काहींना ह्या पैस्यापेक्षा जास्त प्रेक्षकांची मने जिंकायची असतात.

आज आम्ही तुम्हाला अशा एका अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत त्याने ह्या मायानगरीत २८० सिनेमे केले तरीसुद्धा त्याला हवी तशी प्रसिद्धी मिळाली नाही. ह्या अभिनेत्याचे नाव हरीश कुमार आहे. आपल्या करीयरची सुरुवात त्याने बालपणातच केली होती. २०२० चा विचार केला तर आता त्याचे वय ४४ आहे. बालकलाकार म्हणून त्यांनी तमिळ, हिंदी, कन्नड आणि तेलगू भाषेत अनेक सिनेमे केले. त्याचा आतापर्यंतचा प्रवास पाहिला तर आजवर त्यांनी ह्या सर्व भाषेत मिळून २८० सिनेमे केले आहेत. अंधेरी केसरी ह्या सिनेमासाठी त्याला स्टेट लेव्हल पुरस्कार सुद्धा मिळाला होता. नव्वदच्या दशकात कुळी नंबर वन आणि तिरंगा असे ब्लॉग बस्टर सिनेमे त्यांनी दिले आहेत.
गोविंदा सोबत त्यांनी अनेक सिनेमे केले. करिश्मा कपूर सोबत सुद्धा प्रेम कैदी हा सिनेमा त्याने केला होता. पण एवढे सिनेमे करून सुद्धा हवी तशी प्रसिद्धी त्याच्या वाट्याला आलीच नाही. बऱ्याच कालावधीनंतर त्याला सिनेमे मिळणे बंद होऊ लागले. त्यामुळे वयोमानानुसार चेहराही बदलत गेला आणि काम मिळणे कठीण झाले. आपले पाय बॉलीवुड मध्ये रोवण्यासाठी त्यांनी शेवटचा प्रयत्न २०१२ केला. चार दीन की चांदणी ह्या सिनेमात त्याने काम केले ओके तरीसुद्धा हा सिनेमा पूर्णपणे फ्लॉप ठरला.
अनेक सिनेमात मोठमोठ्या कलाका रांसोबत काम करून सुद्धा हा कलाकार आज बॉलीवुड पासून खूप लांब आहे आणि आपले जीवन व्यतीत करत आहे.