हार्दिक पांड्या नेहमीच काही ना काही कारणावरून चर्चेत असतो. पण आज मात्र सर्वांना त्याने अचंबित करून सोडले आहे. ह्याच वर्षी नव वर्षाच्या शुभारंभात त्याने आपली प्रेयसी नताशा सोबत आई वडिलांना कोणतीच माहिती एम देताच साखरपुडा उरकला होता. पण आज म्हणजेच रविवारी त्याने आपल्या सोशल मीडियावरून तो बाप होणार असल्याची माहिती त्याने दिली आहे. त्याची पत्नी नताशा स्टेनकोविक गरोदर आहे.
हार्दिक ने आपल्या पोस्ट मध्ये लिहिले की नताशा आणि मी एक उत्तम प्रवास केला आहे. पण आता आम्ही ह्या प्रवासाला अजुन चांगले करायला चाललो आहोत. आम्ही आमच्या नवीन आयुष्यात अजुन एक नवं जीवनाचे स्वागत करणार आहोत. आयुष्याच्या ह्या वळणावर मी खूप खूष आहे. तुमचे आशीर्वाद सदैव आमच्यासोबत असेच असूद्या.
लग्ना आधीच प्रेयसी गरोदर राहिल्याने अनेक नेटकरी मेम तयार करत आहेत. पण हार्दिकने आपल्या आयुष्यात अनेक चढ उतार पाहिले आहेत. तो ह्या गोष्टीकडे नेहमीच दुर्लक्ष करत आला आहे. सध्या तो आपल्या प्रेयसी सोबत सुखी आहे आणि नव्या येणाऱ्या पाहुण्यासाठी जोरदार तयारी करत आहे.
त्याच्या ह्या आनंदाच्या बातमीसाठी अनेकांनी शुभेच्छा पाठवल्या आहेत. ह्या विदेशी आणि देशी खेळाडूंचा सुद्धा समावेश आहे.