मित्रानो चंकि पांडे याने आपल्या तारुण्यात भरपूर सिनेमे केले. त्यातील काही रोल कॉमेडी तर काही ऍक्शन हिरो चे होते. चंकि पांडे याचे खरे नाव तुम्हाला कदाचित माहीत नसेलही तर यांचे खरे नाव आहे सुयश पांडे. यांनी 80 हून ही अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय त्यांचं मुंबई मध्ये “द एल्बो रूम” नावाचा रेस्टॉरंट ही आहे.

तर आपण आज बोलणार आहोत ते चंकि पांडे यांच्या मराठी भाषेतील येणाऱ्या चित्रपटाविषयी हा कलाकार जरी मराठी नसला तरी ती मराठीतून काम करणार आहे. तर नक्की कोणता असा सिनेमा आहे त्यात चंकि पांडे काम करणार आहे त्याचे नाव आहे “विकून टाक”. चंकि पांडे त्याची भूमिका ही वेगळी असणार आहे महत्वकांक्षी हिलरी डोरोथी या भूमिकेतून चंकि पांडे आपल्याला भेटायला येणार आहे. त्यांच्या जोडीला आपले मराठी अभिनेते शिवराज आणि रोहित हे ही आहेत तर हा सिनेमा ग्रामीण भागातील समस्यांवर आपले मत प्रगट करणार सिनेमा आहे.
उत्तुंग हितेश ठाकूर यांनी निर्मिती केलेल्या या सिनेमात चंकि पांडे महत्वाची भूमिका करताना आपल्याला दिसणार आहेत. त्याचप्रमाणे चंकि पांडे सांगतात की हा त्यांचां मराठीतील पहिला वाहिला चित्रपट आहे तसेच त्यांनी तेलगू आणि मल्याळम या भाषेतील चित्रपट मध्येही काम केले. तर मित्रानो तुम्ही सुद्धा उत्सुक आहात का चंकी पांडे ह्यांना मराठी सिनेमात काम करताना पाहायला.