Home करमणूक गोविंदाच्या परिवारातील हे १० सदस्य ही आहेत लोकप्रिय स्टार

गोविंदाच्या परिवारातील हे १० सदस्य ही आहेत लोकप्रिय स्टार

by Patiljee
444 views

गोविंदा या अभिनेत्याची ओळख तर आपल्या सगळ्यांनाच आहे पण त्याच्या परिवारात ही असे काही कलाकार आहेत ज्यांनी या इंडस्ट्री मध्ये काम केले आहे. कोणी मालिकांमध्ये काम केले आहे तर काहींनी चित्रपट मध्ये छोटे मोठे रोल केले आहेत. आपण कदाचित त्यांना ओळखत असालही पण हा गोविंदाचा नातेवाईक आहे हे आपल्याला माहीत नसेल तर आज आपण पाहणार आहोत की ते कोणते कलाकार आहेत.

अरुण कुमार आहूजा
अरुण कुमार आहुजा हे गोविंदा चे वडील होते त्यांनी ही चित्रपट मध्ये काम केले होते. 40 पासून ते 50 या दशकामध्ये त्यांनी जवळ जवळ 20 चित्रपट केले होते आणि आताच्या काळात हे जरी कमी वाटत असले तरी त्या काळी 20 चित्रपट करणे म्हणजे मोठी बाब होती. ते खूप चांगले अभिनेते म्हणून ओळखले जायचे.

निर्मला देवी
अरुण कुमार आहुजा यांची पत्नी आणि गोविंदाची आई ही सुद्धा याच इंडस्ट्री मध्ये आपली कला लोकांपर्यंत पोचवत होती. तो एक उत्तम गायिका होती. त्यांनी सवेरा, गाली और अनमोल रतन अशा अनेक चित्रपटांमधे काम केले आहे.

कीर्ति कुमार
गोविंदाला जवळ जवळ दहा भाऊ आहेत त्यातील मोठा कीर्ती कुमार हा ही चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेता आणि डायरेक्टर आहे. याने आपल्या कारकीर्दीत नसीब, राधा का संगम, हत्या, आंटी नंबर 1 असे हिट चित्रपट दिले या चित्रपटांमधे तुम्हाला गोविंदा अभिनेत्याच्या रुपात पाहायला मिळाला आहे.

सौम्या सेठ
सौम्य शेठ हिने कलाकार म्हणून अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. ती एक सिंगल मदर असून तिने आपल्या करीयर मध्ये शाहरुख खान ची फिल्म ‘ओम शांति ओम’ यामध्ये ही ती आपल्याला पाहायला मिळते.

टीना आहूजा
ही आहे गोविंदा याची मुलगी तिने आतापर्यंत 2015 ला आलेला एक चित्रपट सेकेंड हैंड हसबैंड आणि जिंदगी का रहस्य या चित्रपटांमधे काम केले आहे

कृष्णा अभिषेक
कृष्णा अभिषेक एक कॉमेडी रोल करणारा कलाकार म्हणून तो प्रसिद्ध आहे तसेच आपल्याला तो नेहमीच कपिल शर्मा या शो मध्ये पाहायला मिळतो. कृष्णा हा गोविंदाचा भाचा लागतो तो गोविंदाची बहीण पद्मा शर्मा हीचा मुलगा आहे.

आरती सिंह
आरती सिंग आताच बिग बॉस 13 मध्ये आपल्याला पाहायला मिळालेली. तिने ही मालिकेमध्ये काम केले आहे मायका, उतरन आणि उडान या मालिकांमध्ये ती आपल्याला दिसलेली तो कृष्णा याची बहीण तर आहे पण गोविंदाची भाची ही आहे.

राहुल शर्मा
या अभिनेत्याने हिंदी मालिकांमध्ये आपले काम फार जोखमीचे केले आहे. अनेक मालिकांमध्ये काम करणारा हा अभिनेता गोविंदाचा भाचा म्हणजेच त्याच्या बहिणीचा मुलगा आहे. या अभिनेत्याने कहानी चंद्रकांता की, सतरंगी ससुराल आणि काल भैरव रहस्य यांसारख्या मालिका केल्या आहेत.

रागिनी खन्ना
रागिणी खन्ना हिने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केले आहे तसेच ती काही चित्रपट मध्ये ही काम केले आहे. तिने आपल्या करिअर ची सुरुवात ” बेटीया कुछ कर दीखायेगी” या मालिकेतून केली होती, ससुराल गेंदा फूल, बात हमारी पक्की है, स्पान बाबुल का बिदाई, एक हजारों में मेरी बहना है, रुक जाना नहीं, याशिवाय रियालिटी शो झलक दिखला जा, देख इंडिया देख, दस का दम सीज 2, कौन बनेगा करोड़पति, कहानी कॉमेडी सर्कस की इत्यादी शो मधे ही ती आपल्याला पाहायला मिळाली आहे. ही सुद्धा गोविंदाची भाची आहे

विनय आनंद
विनय आनंद हा ही गोविंदाचा भाचा याने बॉलिवुड मध्ये तसेच भोजपुरी चित्रपट यांमध्ये काम केले आहे. आमदनी अठन्नी खर्चा रुपइया या हिंदी सिनेमामध्ये हा अभिनेता तुम्हाला पाहायला मिळाला असेलच.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल