80 व्या शतकात निघालेली ही मालिका तुम्हा अजूनही आठवत असेल. या मालिकेतील प्रत्येक पात्र आपल्याला जिवंत वाटायचे कारण त्यांचा अभिनय इतका सुरेख होता की त्यात आपण गुंतून जायचो. या मालिकेत गोट्या हे नाव तुम्हाला माहीतच असेल ते एका मुलाचे नाव आहे. आई नसलेल्या मुलाची ही कहाणी बघताना कधी कधी आपल्याही डोळ्यात पाणी आले असेल. या मालिकेमध्ये महत्वाची भूमिका असणारा म्हणजे बालकलाकार जॉय घाणेकर असे त्याचे नाव आहे. तसेच सुहास भालेकर, सविता मालपेकर, सुमन धर्माधिकारी यांनीही या मालिकेत उत्तमोत्तम भूमिका साकारल्या होत्या.
तसेच सुमन धर्माधिकारी यांची माई ही भूमिका आपल्या त्यावेळी प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. “बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात” हे गाणे अजूनही आपल्याला जुन्या आठवणींचा उजाळा मिळतो. या मालिकेची सुरुवात याच गाण्याने व्ह्यायची आणि तेव्हा ही मालिका पाहण्यासाठी आम्ही टीव्ही समोर मांडी घालून बसायचो. मित्रानो असा जुन्या मालिका बऱ्याच आहेत त्यापैकी ही एक गोट्या जी त्या वेळी प्रेक्षकांच्या मनात उतरली होती. मालिकेतील यशानंतर जॉयने मराठी चित्रपट सृष्टीमध्ये दिग्गज अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांचा ‘राजाने वाजवला बाजा’ या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले होते.
पण त्यानंतर मात्र हा अभिनेता आपल्याला कुठेतरी गायब झाल्यासारखा दिसला. कदाचित त्याला पुढे या चित्रपट सृष्टीत अजिबात रस नसावा म्हणून कदाचित त्याने आपला अजंठा एका वेगळ्या जगाकडे वळवला. हा कलाकार सध्या तरी कुठे राहतो हे माहीत आहे का तर तो सॅन फ्रान्सिस्को येथे राहतो. आता तिथे राहतो म्हणजे नक्कीच तो तिथे काहीतरी करत असला पाहिजे तो “Talech” याहू या वेबाईड चां प्रॉडक्ट हेड म्हणून तिथे काम करत आहे.
आपल्या संसारात तो सध्या आनंदी आहे बायको आणि एक मुलगा असे त्याचे जीवन अगदी उत्तम चालले आहे. आता तो अभिनयाच्या या मायावी दूनियेपासून खूप लांब आला आहे पण त्याचा अभिनय आपण अजूनही विसरलो नाही आहोत.