तुला पाहते रे या मालिकेमध्ये आपण ईशा या नावाने तिला ओळखायचो. काहीही हा सर डायलॉग ऐकला की आपल्याला इशाची आठवण यायची. दिसायला खूप सुंदर अशी ही अभिनेत्री आता मात्र ही सीरियल बंद झाल्यामुळे काय करत असेल असा प्रश्न तिच्या चाहत्यांना नक्कीच पडला असेल? पण या मालिकेतून हिट झालेली अभिनेत्रीचे आताच नववधूच्या वेशातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. हे फोटो पाहून प्रेक्षकांना धक्का बसेल कारण या फोटोमध्ये ती एका नवीन वेशात आपल्याला पाहायला मिळणार आहे.
त्यात तिने एका नववधू जसे लग्नाच्या वेळी कपडे परिधान करते त्याचप्रमाणे ती सजली आहे. कुणालाही वाटेल तीच लग्न आहे की काय? पण हे खरं नाही कारण तिने एका कपड्यांच्या ब्रँड साठी हे फोटोशूट केले आहे.
ती साध्य तरी झी युवा या चॅनल वर डान्सिंग क्वीन् या शोची स्पर्धक आहे. त्याचबरोबर ती सोशल मीडियावर ही नेहमी सक्रिय असते. तिचे सोशल मीडियावर खूप फॅन तिला ह्या नवीन वेशासाठी शुभेच्छा देत आहेत. तुला पाहते रे मालिका संपल्यानंतर गायत्रीने निम्मा शिम्मा राक्षस ह्या नाटकात सुद्धा आपली भूमिका चोख बजावली होती. ह्या नाटकाला लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. तिच्यासोबत मयुरेश पेम, अंकुर वढणे, नितीन जंगम आणि अमृता कुलकर्णी दिसले होते. ह्या नाटकाचे दिग्दर्शन चिन्मय मांडलेकर ह्यांनी केलं आहे.

गायत्री तुम्हाला येणाऱ्या दिवसात एका सिनेमात सुद्धा दिसणार आहे. सिनेमाचे नाव जरी गुलदस्त्यात असले तरी तिची एन्ट्री मात्र धमाकेदार असणार आहे.