Home हेल्थ गव्हाच्या पिठापासून बनवा आईस क्रीम

गव्हाच्या पिठापासून बनवा आईस क्रीम

by Patiljee
436 views

मित्रानो सध्या लॉक डाऊन चालू आहे आणि या महिन्यात गरमी हो खूप वाढली आहे. आता गरमी वाढली आहे पण लॉक डाऊन असल्यामुळे दुकानात आईस क्रीम मिळते किंवा मिळत नाही. दुकानातून आणलेले आईस क्रीम आपल्या लहान मुलांसाठी चांगले असेल की नाही? यात ही शंका असते. त्यामुळे घरातले पदार्थ वापरून तुम्ही ही आईस क्रीम बनवू शकता. त्यामुळे तुमची मुलं आणि घरातले ही खुश होतील.

या आईस क्रीम साठी लागणारे पदार्थ हे आहेत. 1 लिटर दूध, अर्धी वाटी गव्हाचे पीठ, व्हॅनिला इसेन्स आणि साखर, दूध पावडर असेल तर उत्तम नसेल तर काहीच हरकत नाही तशीही ही आईस क्रीम खायला तितकीच चविष्ट लागते.

पहिल्यांदा दूध एका पातेल्यात उकळत ठेवा. त्या दुधातील एक वाटी दूध बाजूला काढून ठेवा, हे टोपात उकळत ठेवलेले दूध अर्धे होईपर्यंत उकळा. तोपर्यंत हे शुद्ध नीट ढवळा त्यावर येणारी साय ही त्यातच मिसळा आणि खाली दूध लागू नये याची काळजी घ्या. आता हे दूध अर्धे झाल्यावर आपण जो एक वाटी दूध बाजूला काढला आहे त्यात गव्हाचे पीठ आणि मिल्क पावडर मिसळा. त्यानंतर हे मिश्रण दूध गरम केलेल्या भांड्यात हळू हळू मिसळा आणि हे मिश्रण हलवत रहा.

हे मिश्रण थंड करा त्यानंतर ते मिश्रण मिक्सरच्या भांड्यात काढा आणि त्यात थोडे म्हणजे 2 ते 3 व्हॅनिला इसेन्स टाका. मिक्सर मध्ये हे सगळं फेटून घ्या. मिक्सर मध्ये फेटल्याने आईस क्रीम चे हे मिश्रण एकदम हलके आणि फुलून येईल. त्यानंतर एका डब्यात हे मिश्रण भरून फ्रिझर मध्ये ठेवा. जास्तीत जास्त 7 ते 8 तास ही आईस क्रीम सेट व्हायला लागतात.

सर्वांनी नक्कीच हा प्रयत्न करा. तुम्हालाही ह्याची चव आवडेल.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल