Home संग्रह गॅसच्या खाली होल का असतात? कधी विचार केला आहे का?

गॅसच्या खाली होल का असतात? कधी विचार केला आहे का?

by Patiljee
216 views

तुम्ही आम्ही सर्वच घरात किंवा व्यवसायात गॅस सिलिंडरचा वापर करत असतो. शेगडी आणि स्टोव नंतर गॅस शेगडी उदयास आली. अगोदर लोक घरात गॅस शेगडी वापरायला घाबरत असे. कारण ह्यात जीवाला धोका आहे, कधीही काहीही होऊ शकतं अशी लोकांची विचारसरणी झाली होती. पण बदलत्या काळानुसार लोकांनी घरात गॅस वापरायला सुरुवात केली. इतर लोक घरात गॅस वापरत आहेत मग आपण का वापरू नये ह्या विचार धारणेने लोकांनी घरात गॅस सिलिंडर आणायला सुरुवात केली. आणि बघता बघता संपूर्ण देशात सिलिंडर ने आपला जम बसवला.

पण घरात गॅस सिलिंडर असताना काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजे. त्या गोष्टी काय आहेत कशा तुम्ही करू शकता हे आपण आज पाहणार आहोत. जेव्हा तुम्ही घरात नवीन गॅस सिलिंडर घरी आणता तेव्हा अगोदर त्याचे सील योग्य आहे का तपासून पाहा. सील असेल तरच सिलिंडर स्वीकारा नाहीतर त्या एजन्सीला परत करा.

गॅस सिलिंडर घेताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. सिलिंडर हातात मिळाल्यावर घेऊन आलेल्या माणसाकडून त्याचे वजन करून घ्या. ती व्यक्ती तुम्हाला असे म्हणेल की आमच्याकडे वजन काटा नाहीये तर त्यांना घेऊन आणायला सांगा. कारण त्यांना वजन काटा सोबत ठेवायचा नियम आहे. त्या सिलिंडरचा वेट १५.५ आणि भरलेल्या गॅसचा नेट वेट १४.२ kg तर ग्रॉस वेट २९.७ असतो. त्यामुळे एवढा वजन भरलाच पाहिजे. एक्सपायरी डेट सुद्धा चेक करून घ्या.

गॅस सिलिंडर वरील झाकण खोलल्या नंतर गॅस लिकिज तर नाही ना होत आहे हे पाहून घेणे. त्यासाठी जसे आपण टायर पंक्चर कसे चेक करतो अगदी तसेच थोड पाणी घेऊन टाकणे. ह्यामुळे जर लीकिज असेल तर बुडबुडे येतील आणि नसेल तर काहीच होणार नाही.

रात्री झोपताना गॅसचे कॉक खालून बंद करणे. हे ह्यासाठी गरजेचे असते कारण कधी कधी घरात उंदरे असल्यामुळे ते गॅसची पाइपलाइन कुरतडून टाकतात. त्यामुळे गॅस लीकिज होण्याच्या धोका उद्भवू शकतो.

मित्रानो तुम्ही नेहमीच गॅस सिलिंडरच्या खाली असलेले होल पाहिलेच असतील. पण तुम्ही कधी हा विचार केला आहे का? की नक्की हे होल कशासाठी दिले जातात? जेव्हा गॅस सिलिंडर आपण वापरत असतो तेव्हा सर्वात मोठी समस्या असते तापमान, एखाद्या गॅस सिलिंडरचे तापमान वाढले तर त्याचे काय परिणाम होतात हे तुम्ही आम्ही पाहिलेच असतील. म्हणूनच हे तापमान समतोल ठेवण्यासाठी हे होल देण्यात आलेले असतात. कारण ह्या होलातून हवा येत जात राहावी आणि त्यामुळे सिलिंडरचा तलभाग नेहमीच समतोलीत थंड रहावा हेच ह्या मागचे उद्दिष्ट असते.

मित्रानो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला माहीत होती का किंवा तुम्ही ह्यापुढे ही दक्षता घ्याल का? आम्हाला नक्की सांगा.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल