श्री दत्त अवतार हा सर्वश्रेष्ठ अवतार मानला जातो. या अवतारात तीन देवांचे रुप आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे ब्रह्मा, विष्णु आणि महेश. श्री दत्ता यांनी महान अशा अनुसया हिच्या पोटी जन्म घेतला आणि म्हणून भक्ताचे कल्याण करण्यासाठी ते श्रीपाद शिवल्लभ नृसिंह सरस्वती अवताराने ते नरसिंह वाडी औदुंबर, गाणगापूर या ठिकाणी प्रगट झाले.
गाणगापूर हे कर्नाटक जिल्ह्यामधील गुलबर्गा जिल्ह्यातील गाव आहे. हे ठिकाण दत्ताच्या मंदिरासाठी अत्यंत प्रसिद्ध असे देवस्थान आहे. दत्ताच्या भक्तासाठी ही पंढरी म्हणून ओळखली जाते. हे मंदिर भीमा आणि अमरजा यांचं संगम ज्या ठिकाणी होते तिथे वसलेले आहे. या ठिकाणी नृसिंह महाराज नेहमी स्नान करण्यासाठी जात असतं. आणि म्हणून भक्तगण ही या ठिकाणी जाऊन अंघोळ करतात येथे अंघोळ केल्याने सर्व पाप धुतली जातात असा समज आहे.
याच ठिकाणी एक भस्माचा डोंगर म्हणून प्रसिद्ध आहे या ठिकाणी भगवान परशुरामांनी मोठा राज यज्ञ केला होता, त्या यज्ञातील भस्माने हा डोंगर तयार झाला. दरवर्षी दर्शनाला येणारे भाविक हा भस्म नेत असतात पण आश्चर्य की हे भस्माचे डोंगर कमीच होत नाही. भूत पिशाच्च यांच्यापासून मुक्ती मिळण्यासाठी लोक या ठिकाणी येत असतात आणि त्यांना मुक्ती ही मिळते. अनेक मंदिरे या ठिकाणी आहेत. गाणगापूर चे महात्म्य हजारो वर्षांपासून चालत आले आहे ते अजूनही कमी झाले नाही.
नृसिंह महाराज यांना श्री दत्ताचे अवतार मानले जाते, नृसिंह सरस्वती यांनी तब्बल जीवनाचे 23 वर्ष येथे वास्तव्य केले आहे, आणि त्यांच्या वास्तव्याने हे क्षेत्र पावन क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. मुंबई मद्रास मार्गावर सोलापूर हून जवळ जवळ 90 किलोमिटर अंतरावर गाणगापूर स्टेशन आहे. तिथून मंदिरात जाण्यासाठी एसटी बस आहेत. या ठिकाणी नाना जातीचे आणि विविध ठिकाणाहून भक्त येत असतात ते कधी कौटुंबिक संकट आल्याने तर कधी अन्य संकट या सगळ्यांना त्रासून गाणगापूर येथे येऊन या ठिकाणी शरण जातात आणि सेवा करतात.
कित्तेक जन गुरु चरित्र सप्ताह करतात तर काही प्रदक्षिणा घालतात तर काही फक्त दत्ताचे नामस्मरण करत असतात. आपल्या हातून कोणत्या तरी प्रकारची सेवा करण्याचे भाग्य या लोकांना मिळते आणि ते श्रींची कृपा संपादन करतात. मंदिराच्या गाभराच्या उत्तरेकडील भिंती च्या एका खिडकीतून पाहिल्यावर श्री दत्ताच्या मूर्तीचे दर्शन होते. गाणगापूर चे महत्व ज्या पादुका मुळे मानले जाते त्या पादुका श्री नृशिह महाराज यांनी यात्रेला जाण्याअगोदर भक्तांच्या आग्रहाखातर येथे स्थापन केल्या. येथे असणाऱ्या अनेक तिर्थांमधे स्नान केल्यास अनेक प्रकारचे पुण्य तुमच्या पदरात पडते.