त्यांची आणि माझी ओळख इंस्टाग्राम वर झाली. मी जूनमध्ये इंस्टाग्राम वर जॉईन झालो होतो. सर्वच कमाल करत आहेत मग आपण पण आपला कमाल दाखवू असा विचार तेव्हा केला होता. त्याच काळात आमची ओळख झाली. ओळख झाल्यानंतर पुढील महिनाभर आम्ही तिथेच मेसेजमध्ये बोललो. पण माझ मन राहिले नाही आणि मी स्वतः हून विचारल तुमचा मोबाईल नंबर मिळेल का? त्यांनी नबंर दीलाही लगेच. कदाचित त्यांना सुद्धा माझ्याशी मैत्री अजुन वाढवायची होती. मी खूप खूश झालो. पण समोरून त्यांनी नियमावली सुद्धा दिली. सांगितले की हा फोन आईचा आहे. पण शक्यतो मीच वापरतो जास्त. कॉल मेसेज करताना सांभाळून करत जा. मी सुद्धा ते स्वीकारले कारण मला तिला अजुन जास्त ओळखायचे होते.
ऐश्वर्या ह्या घरातील सर्व कामे करून, कॉलेज करून लहान मुलांना शिकवत सुद्धा होत्या. छोटासा क्लास सुद्धा त्या चालवत होत्या. खूप प्रेमळ, विश्वासू , मोठ्या मनाच्या, असे खूप काही चांगले गूण त्यांच्यात मला आढलून आले होते. समजूदारपणा हा त्याचा सर्वात चांगला गुण. ओके तर अशी आमची ऐश्वर्या. जेव्हा आमचे नंबर एकमेकांना शेअर झाले. तेव्हा त्याना दुसऱ्या दिवशी मी लगेच विचारलं की मला फोनवर बोलयच आहे. त्या हो बोलल्या. मग मी त्यांना फोन केला. समोरून गोड हॕलो हा शब्द कानावर पडला आणि मन एकदम खूश झालो. किती गोड आवाज होता तो.
पहिल्यांदाच त्या माझ्याशी फोनवर बोलत होत्या. तेव्हा त्या खूप घाबरल्या मला बोलल्या की माझे विश्वासच बसत नाही की आपण फोनवरवर बोलतोय. त्यांच्या सारखी माझी पण अवस्था झाली होती. मी फक्त ऐकत होतो आणि त्या बोलत होत्या. खूप बोललो आम्ही पाहिल्याच दिवशी, कुणा मुलीसोबत एवढे फोनवर बोलायची ही माझी पहिलीच वेळ होती. पण खूप भारी वाटत होतं. आणि माझ्या चेहऱ्यावर तो आंनद झळकत होता. तेव्हा पासुन आमच्यात दररोज खूप फोन कॉल, मेसेज चाट, व्हिडिओ कॉल असे अनेक पद्धतीने बोलणे होऊ लागले होते.
खूप छान वाटायचे मनातून की आपलही कुणीतरी हक्काचं आता आहे. हळू हळू आमच बोलण प्रेमाच्या भाषेत बदलू लागले होते. खूप प्रेमळ वाटायच ते बोलणं. त्यांच्या परिक्षा मे मध्ये संपून सुट्या पडल्या होत्या. त्या सुट्यामध्ये आम्ही खूप बोललो. त्या ह्या सुट्यामध्ये फिरायला जायच्या, क्लास घ्यायच्या आणि मला सुद्धा बोलण्यासाठी खूप वेळ द्यायचा. अस करता करता त्यांचं कॉलेज पुन्हा झालं. अस दररोज बोलणं चालू असताना तीन चार महिने कधी गेले आमचे आम्हालाच कळले नाही. आम्ही सर्व गोष्टी एकमेकांना शेअर करायचो. खूप चांगला वेळ त्यांच्यासोबत मी घालवत होतो. कधी हसलो, कधी मस्ती केली, कधी राग सुद्धा दाखवला.
ह्याच काळात गणपती, दिवाळी असे बरेच सण आमच्या आयुष्यात येऊन गेले. आयुष्य अगदी कसे परिकथेतील कथे प्रमाणे छान चाललं होतं. आता तुमच्याही मनात हा प्रश्न नक्कीच आला असेल कित एवढ्या महिन्यात भेट नाही झाली का आमची? पण ह्याचे उत्तर नाही आहे कारण आम्हा दोघांमध्ये अंतर खूप होत. लाँग डीस्टेन्स म्हणतात ना अगदी तसेच. आम्ही एक एकमेकांपासून ४०० किमी लांब होतो. असे नव्हते की आम्हाला भेटायचं नव्हते, भेटायची मनात खूप इच्छा होती. पण ती वेळ कधी जुळूनाच आली नाही. कारण ती पण मला सारखी बोलायची की तुमच्या वाढदिवसाच्या आधल्या दोन तीन दिवस आधी भेटायच मला.
ऑफिसमध्ये जास्त काम असल्यामुळे मला त्यांना भेटण्यासाठी वेळ मिळालाच नाही. त्या अवस्थ झाल्या पण दाखवून देत नव्हत्या. माझीही तीच अवस्था होती. दोघेही एकमेकांना खूप धीर देत होतो की आपली लवकरच लवकर भेट होईल, आपण ती घडवून आणू आणि नक्की भेटू. हे सर्व चालू असताना आमच्या नात्यात एक दिवस दुःखाचा आला. खूप सार दुःख घेवुन आला ते दोन दिवस दोघानाही खूप ञास झाल. खरतर माझीच चुकी होती ती, माझ्या एका टिंगल मुले हे सर्व खराब होऊन बसलं. मी त्यांना रागारागात वाईट शब्द बोललो होतो. (अपशब्द वापरले नाही) त्यांच्या मनाला ते खूप लागलं होतं.
त्या सुद्धा रागाच्या भरात मला एक शब्द बोलुन गेल्या की जो माझ्या मनाला खूप लागला पण त्यांना नंतर खूप दुःख झाले. फोन करून त्यांनी माझी माफी मागितली, खूप रडल्या त्या फोनवर बोलता बोलता. पण माझ्या बोलण्याने सुद्धा त्या दुखावल्याच होत्या. मी सुधा त्यांना खूप समजावत होतो. ती वेळच खूप वाईट होती आमच्यासाठी पण मी सर्व ठीक केलं. कारण मला माहीत होत ह्यात चूक माझीच होती. पण दुसऱ्या दिवशी जे घडायला नको हवं होतं तेच झालं. कारण ते गैरसमज येवढा वाढला होता की आम्ही एकमेकांपासून लांब चाललो होतो. प्रत्येकाच्या भावनाचा आदर आपण केलाच पाहिजे. तिने जो प्रश्न विचारला होता तो अगदी योग्य होता. पण मीच त्या प्रश्नांचे उत्तर व्यवस्थित दिले नाही.
पण माझ्याच डोक्यात परिणाम झाल्यासारखं मी वागत होतो. तेव्हापासून त्यांच्यासोबत मी बोलणं बंद केल. कारण आता अजून भांडून मला त्यांना ञास द्यायचा नव्हता. ती माझी चूक मलाही आयुष्यभर आठवणीत राहिल. तेव्हा पासून आमच बोलण बंद झालं. ना मेसेज, ना कॉल काहीच नाही. मी मेसेज करत नाही म्हणून त्यांनी सुद्धा केला नाही. आम्ही दोघानी अनेक रात्री दुःखात काढल्या असतील. मला खूप आठवण येत होती तिची…. हळू हळू दिवस पुढे जावू लागले. आमच बोलन बंदच झाले. मला वाटलं आता कधीच बोलण होणार नाही.
दिवसा मागून दिवस जात होते. त्याच काळात माझा डिंसेबरमध्ये वाढदिवस आला. तेव्हा मला तिची खूप आठवण येत होती. कारण मला माहीत होत ती वाढदिवसाच्या शुभेच्छा तरी नक्की देणार .मी तशी वाट सुधा बघत होतो. कारण तिने अगोदर पासून माझ्या वाढदिवसा साठी खूप काही ठरवून ठेवलं होतं. त्यावेळी खूप काही करणार होती माझ्यासाठी. वाट बघत असता मला माझ्या एक मित्रांचा फोन आला की अरे तुझ्या फोटोवर एका मुलीने तुला शुभेच्छा पाठवल्यात. मी लगेच समजलो की ह्या शुभेच्छा ऐश्वर्याने पाठवल्या असतील. मी सुद्धा त्याना इंस्टाग्रामवर मेसेज करून धन्यवाद म्हटलं . पण तो मेसेज त्यांनी पाहिला सुद्धा नाही. तरी सुद्धा मला खूप छान वाटतं होतं. त्यामुळे माझा तो दिवस सुद्धा खूपच आंनदात गेला .
मी त्यांच्या मेसेजची वाट दोन तीन दिवस पहिली पण त्यांनी मेसेज केला नाही. तस हळू हळू दोन महिने गेले पण त्या माझ्याशी बोलत नव्हत्या पण ज्या स्टोरी इंस्टावर ठेवायचो त्या कधी कधी त्या पहायच्या. त्या छोट्याश्या जगात सुद्धा मी खुश होतो. पण त्यांचे फोटोज् मला पाहायला मिळत नव्हते कारण त्यांचे अकाउंट प्रायव्हेट होतं. जेव्हा मार्च महिन्यात मी माझ्या इंस्टाग्रामवर माझा फोटो स्टोरी मध्ये ठेवला होता. तेव्हा त्यांनी तो फोटो पाहिला. तेव्हा माझ्या मनातून आवाज आला की अजुन किती हा दुरावा, म्हणून मी त्यांना मेसेज केला. काय मॅडम आहे का नाही आठवण आमची? क्षणार्धात त्यांचा सुद्धा रिप्लाय आला. तुम्हाला कस विसणार? पण आम्हाला विश्वास बसत नाही की तुम्ही आज मेसेज कसा केलात आम्हाला? त्यानी त्यांच्या आईला चिमटा काढयला सांगितले. मग त्यांना विश्वास पटला की मी मेसेज केला आहे.
आमचे बोलणे पुन्हा एकदा सुरू झाले. आमच्या ज्या शंका कुशंका होत्या त्या आम्ही दूर केल्या. आमच्या मधला जो दूरवा होता तो आम्ही संपवून टाकला होता. त्या दिवशी सुधा खूप बोलणं झाल कारण ते बोलणं पाच महिन्या नंतर झाले होते. त्या सुधा बोलल्या तुमची आठवण रोज आल्याशिवाय राहत नव्हती. रोज आठवण यायची तुमची, बऱ्याच वेळा वाटतं होत तुम्हाला मेसेज करावा पण हिम्मत होत नव्हती. हे ऐकुन माझेही मन खूप खूश झाल होतं. मला पण तुमची आठवण खूप यायची वो पण आपल्यात जे काही गैरसमज झाले होते ते सर्व गैरसमज माझ्याच चुकांमुळे होते. म्हणून आतून ह्या गोष्टी खूप खात होत्या मला.
त्यानंतर आमची आमचे सर्व रुसवे फुगवे दूर करत पुन्हा ऐकदा नवीन पद्धतीने नात्याला सुरवात केली. आमचे जुने दिवस परत आले होते. मग हे बोलण आमचे रोजच चालू आहे. रोज सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत वेळ मिळेल तेव्हा बोलत असतो. हे आमचे नातं असेच चालू राहणार मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे. या नात्यात खूप विश्वास आहे आणि खूप प्रेम आहे. पण तरीसुद्धा ह्या नात्याला अजुन नाव नाहीये. येणार काळ कदाचित ते सांगू शकेल.
मला ऐश्वर्या बद्दल तुम्हाला काही गोष्टी नक्कीच सांगायला आवडतील.
कुणाचही मन जिंकेल असा तिचा स्वाभाव, तिच्या स्वभावातच खूप प्रेम आहे.
तिचा सुंदर निरागस चेहरा मी स्वतः ला विसरून जातो. समजूदारपणा हा तिचा सर्वात मोठा कौतुक करण्यासारखा गुण आहे. आज त्यांनी मला समजून घेतल म्हणून हे नातं पुन्हा नव्याने सुरू झालं. खूप मोठ्या मनाच्या आहेत त्या, त्यांचं वागण हे एक आदर्श व्यक्तीमत्व आहे. कारण कमी वयात खूप मेहनत करतात त्या, वयाच्या १८ व्या वर्षी कॉलेज करून लहान मुलांचा क्लास घेऊन घर कामात पण हातभार लावतात. भविष्यात त्यांना देशसेवा करायची आहे म्हणून त्या भारतीय आर्मी मध्ये रुजू होण्यासाठी आताच प्रयत्न करत आहेत. हे ऐकुन मला त्यांचा खूप अभिमान वाटत आहे.
ऐश्वर्या खंरच तुम्ही ग्रेट आहात.
लेखक : पाटीलजी