आजच्या काळात फ्रीज ही वस्तू सर्वांकडेच पाहायला मिळते पण त्यात ठेवल्या जाणाऱ्या सर्वच वस्तू खाणे हे आपल्या आरोग्यासाठी हितकारक आहेच असे नाही. बटाटा हा आपण रोजच्या स्वयंपाकात वापरतो कारण लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आवडणारा हा बटाटा आपण आणताना एक ते दोन किलो आणतो आणि तो खराब होऊ नये किंवा त्याला कोम फुटू नये म्हणून आपण नेहमीच बटाटा फ्रीज मध्ये ठेवत असतो. पण हा बटाटा फ्रीज मध्ये ठेवल्याने नुकसान आपल्याच शरीराचे होते हे तुम्हाला माहीत आहे का?
बटाटा फ्रीजमध्ये ठेवल्याने पहिली गोष्ट म्हणजे त्यातील स्टार्च चे साखरेत रूपांतर होते, शिवाय फ्रीजमध्ये ठेवल्याने बटाट्याची चव ही बदलते त्याच्या सालीवर ही डाग पडतात आणि याकरिता तुम्हाला फ्रीज मध्ये बटाटा ठेवायचाच असेल तर तो प्लास्टिकच्या पिशवी मध्ये ठेवा.
शिवाय बटाटा उष्ण ठिकाणी ही ठेऊ नये याकरिता घरातील कोणतीही थंड जागा बघा आणि त्या ठिकाणी बटाटा ठेवावा. बटाट्याला थंड हवामान मानवते, पण अतिथंड नाही. फ्रीजचे तापमान अतिशय कमी असेल आणि त्यात बटाटी ठेवली गेली असतील तर बटाट्याची मूळ चव बिघडते .
फ्रीजमधील बटाटे खाल्ल्यामुळे कर्करोगासारखी दुर्धर व्याधीही होऊ शकते. फ्रीजमध्ये ठेवलेले बटाटे शिजवल्यानंतर त्यात अॅक्राइलामाइड रसायनाची निर्मिती होते आणि हे रसायन पोटात गेल्यानंतर बराच त्रास होऊ लागतो. त्यामुळे बटाटे कोरड्या जागी ठेवायला पाहिजे.
जास्त गरज नसल्यास बटाटे फ्रीज ठेऊ नये त्यामुळे तुमच्याच आरोग्याशी तुम्ही खेळत आहात हे लक्षात घ्या.