मित्रानो सध्या पावसाचे वातावरण सुरू आहे. या वातावरणात आपल्या घरात माशांचा वावर आपल्या घरात पाहायला मिळतो. किती प्रयत्न केले तरी या माशा जाण्याचे नाव घेत नाही. या माशांमध्ये कधीकधी आजारपणाला सामोरे जावे लागते. कारण या माशा घानीवर बसतात आणि त्यानंतर उठून लगेच आपल्या घरात कुठेही किंवा अन्न धान्यावर बसतात. त्यामुळे त्यांच्या शरीरावरचा जंतू आपल्या पोटात जाऊन आजार बळावतात. तर या अशा माशा घरात येत असतील तर आपण काय उपाय करू शकतो ते पाहूया.
घरातल्या घरात करण्यासारखे हे उपाय आहेत. त्या साठी एक लिंबू घ्या, तो मध्यभागी कापा. त्याला सगळीकडे लवंगा पेरा आणि हे लिंबू माशा येणाऱ्या ठिकाणी ठेवा. लिंबाच्या वासाने माशा येत नाहीत.
मित्रानो कापूर हा अत्यंत आवश्यक घटक आहे. तो सगळ्यांनीच घरात ठेवायला हवा. हा कापूर जळाल्याने घरात माशा येत नाहीत. किंवा याच्या वासाने ही त्या लांब पळून जातात.
मित्रानो निलगिरी तेल मेडिकल मधे याची बाटली मिळेल. या निलगिरीच्या तेलाच कापसाचा बोळा बुडवून त्या ठिकाणी ठेवा माशा येणार नाहीत.
घरात सकाळ संध्याकाळ धूप पेटवा या वासावे माशा घरात येत नाहीत.
महत्वाचे म्हणजे पावसाळ्यात घर नेहमी सुके आणि स्वच्छ राहील याकडे लक्ष द्या लादी किंवा टाइल्स स्वच्छ फिणेलने पुसून काढा.
हे उपाय तुम्ही नक्की करा बघा तुम्हालाही ह्याचा प्रत्यय येईल. हे पण वाचा चहा प्या तो ही फक्त कोरा आणि रहा हेल्दी बघा कोणकोणते फायदे मिळतात