बॉडी बनवणे हे प्रत्येकालाच जमत नाही. सर्वांना असेच वाटत आपणही आपली बॉडी करू शकतो पण जेव्हा तुम्ही जिम लावता तेव्हा त्यामागची मेहनत तुम्हाला कळून येते. पण काही लोकं अशीही असतात जे दिवसरात्र मेहनत करून आपली बॉडी अशी तयार करतात की आपण त्यांच्याकडे पाहतच बसतो. आज आम्ही तुम्हाला अशाच पाच इन्स्पेक्टर बद्दल सांगणार आहोत जे आहेत तर पोलिस पण त्यांची बॉडी पाहून भले भले गुन्हेगार हात टेकतात.
किशोर डांगे
आपल्या महाराष्ट्राची शान किशोर डांगे जेव्हा पोलीसच्या युनिफॉर्म मध्ये असतात तेव्हा त्यांचा थाट काही वेगळाच असतो. ९५ Kg वजन गटात ते मराठा श्री आणि मुंबई श्री असे मानाच्या समजणाऱ्या स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकले आहेत. एवढेच नव्हे तर अमेरिकेत झालेल्या स्पर्धेत सुद्धा त्यांनी भारतासाठी सुवर्णपदक पटकावले आहे. दोन वेळा मिस्टर इंडिया सुद्धा ते राहिले आहेत. लंडन मध्ये झालेल्या पोलिस फायर गेम्स मध्ये सुद्धा त्यांनी मेडल जिंकले आहे. सध्या ते महाराष्ट्र पोलिस दलात रुजू आहेत.

रुबल धनकर
रुबल धनकर ह्याचा रुबाब एवढा आहे की त्याचे नाव जरी ऐकले तरी अपराधी गुन्हे कबुल करतात. ते सध्या दिल्ली पोलीस मध्ये कार्यरत आहेत. प्रोफेशनल बॉडी बिल्डिंग मध्ये नेहमीच ते भाग घेत असतात. फिटनेसचे धडे सुद्धा ते आपल्या यूट्यूब चॅनेलवर देत असतात. ८ लाखाच्या वर तिथे लोक त्यांना जोडले गेले आहेत. ह्या आधी सुप्रसिद्ध शो रोडिज एक्स ४ मध्ये सुद्धा ते आपल्याला दिसले होते.

सचिन अतुलकर
फिटनेसच्या बाबतीत नेहमीच सतर्क असणारे आणि वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी आयपीएस अधिकारी बनणारे अधिकारी म्हणून सचिन अतुलकर ह्यांची ओळख आहे. सध्या ते भोपाळ पोलिस दलात कार्यरत आहेत. आपल्या बॉडीमुले ते अनेक युवकांचे प्रेरणास्रोत बनले आहेत. त्यांनी आजवर एकही बॉडी बिल्डिंग स्पर्धेत भाग घेतला नाही आहे. पण क्रिकेट आणि घोडेस्वार मध्ये त्यांनी सुवर्णपदक जिंकले आहेत.

अमित छेत्री
चार वेळा मिस्टर इंडिया स्पर्धा आपल्या नावावर करणारे अमित छेत्री हे सध्या उत्तराखंड पोलिस दलात कार्यरत आहेत. २०१३ ला त्यांनी शेरू क्लासिक स्पर्धा जिंकली होती. याचबरोबर २०१५ अमेरिकेत झालेल्या वर्ल्ड पोलिस स्पर्धेत सुद्धा त्यांनी सुवर्णपदक जिंकले होते. त्यांना क्षेत्रीय गोरखा बॉडीबिल्डर ह्या नावाने सुद्धा ओळखले जाते.

तेजिंदर सिंह
लहानपणापासून आपल्याला बॉडी बिल्डर बनायचे आहे. हेच स्वप्न उराशी बाळगून तेजिंदर ह्यांनी आयुष्याला सुरुवात केली होती. २००६ मध्ये उत्तराखंड पोलिस दलात ते रुजू झाले. त्यानंतर मिस्टर हर्कुलस आणि नॅशनल बॉडी बिल्डिंग स्पर्धा आपल्या नावावर केली.