FasTAG नक्की काय आहे? कसे वापरतात? कुठे मिळतो? असे अनेक प्रश्न सर्वांना पडलेच आहेत. सरकार भारतात डिजिटल गोष्टी सुरू करत आहेत. कॅशलेस इंडिया म्हणून अनेक मोहिमा चालू आहेत. म्हणून FasTAG ची सुद्धा निर्मिती करण्यात आली आहे. तुम्हाला आता टोलवर कॅशने पैसे न देता ऑनलाईन आपोआप पैसे ह्या फास्ट टॅग पद्धती द्वारें भरले जातील. भारत सरकारने १ डिसेंबर पासून सर्व ठिकाणी FasTag लागू केलं आहे. सध्या तुम्ही तुमच्या वाहनाला फास्ट टॅग लावला नाही तर तुम्हाला जास्त टोल द्यावा लागू शकतो. त्यामुळे तुमच्याही मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले असतील.

तुम्हीही आता फास्ट टॅग लावला आहात किंवा लावण्याच्या विचारात आहात तर आपण आज ह्या संदर्भातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत. तुम्हाला जो FasTAG आयडी मिळेल तो व्यवस्थितरीत्या तुमच्या गाडीवर तुम्हाला चिपकवयाचा आहे. जर तुम्ही योग्यरीत्या नाही लावलात तर हवे ये बेनिफिट तुम्हाला मिळणार नाहीत. कारण तुम्ही जेव्हा टोलनाक्यावर जाता तेव्हा त्यांचा सेंसर योग्यरीतीने काम करत नाही. त्यामुळे चिपकवताना ह्याची काळजी घ्या की तो व्यवस्थित लावला गेला पाहिजे. नेहमी FasTAG गाडीच्या आतमधून लावावा. बाहेर काचेवर लाऊ नये.
लावताना तुम्ही आरशाच्या मागे लावा जेणेकरून सेन्सर तिकडे लगेच स्कॅन करून शकेल नाहीतर तुम्हाला बऱ्याच वेळा गाडी मागे पुढे घ्यायला लागू शकते. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की तुम्ही जेव्हा FasTAG लावता तेव्हा त्यात बॅलेन्स असणे गरजेचे आहे. तुम्ही बॅलेन्स ऑनलाईन पोर्टलवर जाऊन सुद्धा चेक करू शकता. जर FasTAG Paytm मधून ऑर्डर केलं असेल तर त्याचे बॅलेन्स तुम्हाला Paytm वॉलेट मध्ये पाहायला मिळेल. जर तुमच्या खात्यात बॅलेन्स नसेल आणि तुम्ही टोलनाक्यावर गेलात तर तुमचं वाहन बॅकलिस्ट मध्ये दाखवले जाते. म्हणून तुम्ही अगोदरच रिचार्ज करून घ्या. रिचार्ज सुद्धा कमी किमतीचा न करता ५०० ते १००० पर्यंत करा. ह्याची वैधता तुम्हाला पाच वर्ष असते.
जेव्हा पण तुम्ही फास्ट टॅग विकत घ्याल तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्याच्या नावावर आरसी आहे त्याच्याच नावावर खरेदी करा. जर तुमचा फास्ट टॅग चुकूनही चोरी झाला तर तुम्ही ज्या बँकेचा तुमचा फास्ट टॅग आहे त्या ग्राहक क्रमांकावर कॉल करून ब्लॉक करू शकता. मग तिथून तुम्हाला तुमचे पैसे रिफंड केले जातात. सरकार ने ही सुविधा सुद्धा उपलब्ध केली आहे. मित्रानो तुम्ही कुणी लावला आहात का फास्ट टॅग? तुमचा ह्याबाबत कसा आहे अनुभव आम्हाला नक्की सांगा.