Home खेळ/Sports T20 FINAL : इंग्लंड ठरला विश्वविजेता, या कारणाने पाकिस्तान पराभूत

T20 FINAL : इंग्लंड ठरला विश्वविजेता, या कारणाने पाकिस्तान पराभूत

by Patiljee
154 views

इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान असा विश्वकप सामना आज खेळण्यात आला. भारतीय संघ आज फायनल मध्ये नसल्याने जास्त कुणी टीव्ही कडे नजर फिरवली नाही. पण मॅच मध्ये चांगला खेळ खेळत इंग्लंड संघाने T20 वर्ल्डकप 2022 आपल्या नावावर केला आहे.

प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघाची सुरुवात निराशाजनक झाली. बाबर आणि रिझवान सेमी फायनल मध्ये जसे खेळले तसा खेळ त्यांना इथे दाखवता आला नाही. रिझवान अवघ्या १४ चेंडूत १५ धावा काढून बाद झाला. बाबर चांगल्या फॉर्म मध्ये दिसत असताना आदील रशीद ने त्याला बाद केले. पाकिस्तान कडून मसूद ने सर्वाधिक ३८ धावा केल्या.

इंग्लंड कडून सॅम करन ने तीन, रशीद आणि जॉर्डन ने प्रत्येकी दोन तर स्ट्रोक ने एक गडी बाद केला. पाकिस्तान ने वीस षटकात ८ गडी गमावत १३७ धावसंख्या उभारली. सेमी फायनल मध्ये भारतीय संघाला दहा गडी राखत पराभूत केलं होतं. पण पाकिस्तान गोलंदाजाने काही षटकातच सलामीला आलेल्या अलेक्स आणि बटलर ला मैदानाबाहेर पाठवले.

ब्रुक ने वीस धावांची खेळी केली. दुखापती मुळे शाहीन आफ्रिदी ने आपली षटके पूर्ण न करताच मैदानाबाहेर गेला. बेन स्ट्रोक आणि मोईन आली ने उत्कृष्ट खेळी करत इंग्लंड संघाला विजय श्री खेचून आणला.

पाकिस्तान संघ या सामन्यात परत येऊ शकला नाही याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांनी केलेली फलंदाजी. फायनल सामन्यात १६० धावसंख्या असली तरी ती खूप असते पण पाकिस्तान संघाला तो सूर गवसला नाही. अखेर इंग्लंड ने बाजी मारत. हा विश्वकप आपल्या नावावर केला.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल