मित्रांनो या जगात कोणतेही काम करताना लाज बाळगू नये. कोणतेही काम छोट किंवा मोठं नसते त्यासाठी माणसाचे मन मोठं असायला हवं. हेच गुण असतील कदाचित या वाघिणीच्या अंगी आणि ते तिने तिच्या जिद्दीने दाखवून ही दिले आहे. रुपाली शिंदे ही मूळची शिंगवे निफाड तालुक्यातील, हा तिचा गाव मुळात तिने 2015 साली इंजिनिअरची पदवी मिळवली. त्यानंतर तिने खाजगी कंपनीमध्ये नोकरी ही केली. पण शिक्षणासारखे तिला कुठेही पगार मिळाला नाही. त्यामुळे तिने हातातली नोकरी ही सोडली आणि एक वर्ष ती घरातच राहिली.
आता परत नोकरीच्या मागे लागायचं नाही दुसऱ्याची चाकरी करण्यापेक्षा स्वतचं एक छोटासा उद्योग काढायची तिची मनापासून इच्छा होती. पण इतकं शिक्षण झाले आणि त्यातून लहान सहान युद्योग केल्यास आजूबाजूच्या लोकांची काय प्रतिक्रिया असेल याची तिला खात्री होती. तिला लोकांनी खूप नाकारले तसेच नातेवाईकांनी ही यासाठी विरोध केला पण तरीही तिने मोठ्या जिद्दीने आपला चहाचा उद्योग सुरू केला. यासाठी तिला तिच्या घरातल्यांची मदत झाली. ते नेहमी तिच्या पाठी राहिले. सायखेडा येथे 1 नोव्हेंबर २०१८ रोजी ”माऊली चहा कट्टा” नावाने चहाविक्रीचा व्यवसाय सुरू केला.

तंदूर व बासुंदी या चहा विक्रीतून तिने अनेक ग्राहक मिळवले आहेत. दररोज ती ५०० कपापर्यंत विक्री करते. आता महिन्याला तिच्या हातात फायदा म्हणून जवळ जवळ 60 हजार रुपये येतात. मित्रानो तुम्हीही समाजात कोणताही प्रकारचा व्यवसाय करा कोणत्याही कामाची लाज बाळगू नका. म्हणायला लोक तयार असतात पण देणारा फक्त तो असतो आणि म्हणून लोकांच्या बोलण्यावर जाऊ नका तुमच्या मनाला जे वाटेल तेच करा.