आपल्या भारतीय सिनेसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आपल्याला पाहायला मिळतात ज्या विदेशातून येऊन आपले नाव बॉलीवूड इंडस्ट्री मध्ये बनवले आहे. ह्या लिस्टमध्ये नोरा फतेही, कतरिना कैफ, एमी जॅक्सन, जॅकलिन अशा अनेक अभिनेत्रींचे नावे आपल्याला पाहायला मिळतात. आज आम्ही अशाच एका अभिनेत्री बद्दल सांगणार आहोत जी स्वीडनवरून भारत फिरण्यासाठी आली होती आणि आता इथे चांगले नाव कमावून अभिनेत्री झाली.
ह्या अभिनेत्रीचे नाव एली अवराम आहे आणि ती स्वीडनची नागरिक आहे. तिची आई सुद्धा अभिनेत्री आणि वडील संगीतकार आहेत. लहानपापासूनच तिला आपल्या आईकडून अभिनयाचे धडे मिळाले आहेत. अभिनय, डान्स आणि गायन ह्या गोष्टी तिला मनापासून आवडतात. २००८ मध्ये तिच्या देशातील एका सिनेमात सुद्धा तिने काम केलं आहे. २०१२ मध्ये जेव्हा स्वीडन वरून पहिल्यांदा ती भारतात फिरण्यासाठी आली होती तेव्हा तिची ओळख मॉडलिंग एजेंसीच्या काही लोकांसोबत झाली.

त्यातील काही लोकांना तिचा चेहरा मॉडेलिंग साठी उत्तम आहे असे वाटले म्हणून त्यांनी तिची इंटरव्ह्यू घेतली. ह्या इंटरव्ह्यू मध्ये तिचा परॉर्मन्स चांगला आढळून आला. त्यामुळे ह्या एजन्सी मार्फत तिचे अनेक फोटोशूट करण्यात आले. अखेर तिला अक्षय कुमार सोबत एका जाहिरातीत काम करण्याची संधी मिळाली. ही संधी फक्त काही सेकंदाची होती तरीसुद्धा एलीने ही ऑफर स्वीकारली. पण तिला खरी ओळख तिच्या पहिल्या सिनेमातून म्हणजेच मिकी व्हायरस मधून मिळाली.
ह्या सिनेमात काम करण्यासाठी कुणी विदेशी मुलगी हवी होती. त्यामुळे तिने इथे ऑडिशन दिला आणि ती सिलेक्ट सुद्धा झाली. ह्या सिनेमात ती मनीष पॉल सोबत स्क्रीन शेअर करताना दिसली. हा सिनेमा जरी बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला तरी एलीने बॉलीवुड मध्ये आपली जागा निर्माण केली होती. ह्या सिनेमातील गाणी अतिशय सुंदर आहेत. तुम्ही आजही ऐकू शकता. ह्या सिनेमांनंतर एलीने अनेक जाहिरातीत काम केली. ह्यानंतर २०१३ मध्ये बिग बॉसच्या सातच्या सीझनमध्ये ती आपल्याला दिसली. बिग बॉस मुले ती घराघरात जाऊन पोहोचली.
त्यानंतर अक्षय कुमार जज करत असलेल्या लाफ्टर चॅलेंज ह्या रिऍलिटी शो मध्ये ती आपल्याला सूत्रसंचालन करताना दिसली. कपिल शर्माच्या शो मध्ये सुद्धा ते कधीतरी पाहायला मिळते. द व्हर्दिक्ट ह्या वेब सिरीज मध्ये सुद्धा तिने काम केलं आहे. तिच्या सिने कारकिर्दीत हवी तशी सफलता तिला मिळाली नाही. सध्या ती सिनेमात आपल्याला आयटेम साँग करताना दिसते. तिचे आणि भारतीय अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याचे प्रेम प्रकरण चालू आहे, अशा बातम्या पण समोर आल्या होत्या. सध्या एली मुंबई मधेच राहत आहे. लवकर ती आपल्याला मलंग ह्या सिनेमातून दिसणार आहे.