आजोबा आज कपाटात तुमच्या कॉलेजचा फोटो पाहिला. कसले भारी डेशिंग हिरो दिसत होता तुम्ही, पप्पा पेक्षाही भारी एकदम. नातवाचे हे शब्द ऐकून खरंच राम भाऊंचे मन भरून आले. डोळ्याला लागलेला चष्मा सावरत ते कपाटाकडे वळले. फोटोचा अल्बम बाहेर काढून जुन्या आठवणींना नातवंडांसोबत सांगू लागले. बाळा ह्या फोटोत माझ्यासोबत असणारी ही मुलगी माहित आहे का कोण आहे? अहो आजोबा आजी आहे ती, चेहरा दिसतोय सारखाच, ते थोडे हसले आणि म्हणाले बाळा तू सुद्धा इतरांसारखा फसलास. ही तुझ्या आजीची मोठी बहीण जानकी आहे.
राम भाऊं जुन्या आठवणीत रमले. कारखान्यात काम करत असताना जानकी आणि राम भाऊ ह्यांची ओळख झाली होती. तेव्हा जास्त मुलं मुली एकमेकांसोबत बोलत नसायचे पण तरीसुद्धा राम भाऊ रोज जानकी देवीना निरखून पाहायचे. काम करता करता तिला पाहत त्यांचा दिवस कधी जायचा हे त्यांना सुद्धा कळत नसायचे. आता हा त्यांचा दिनक्रमच झाला होता. जानकी देवी ना सुद्धा हे कळून चुकले होते. त्यांना सुद्धा राम भाऊ आवडू लागले होते. त्या काळात सुद्धा त्यांची भरदार शरीरयष्टी सर्वांना आकर्षित करत होती.
जानकी देवीना आपल्या मनातली गोष्ट न सांगता राम भाऊ सरळ आपल्या आई वडिलांना घेऊन लग्नाची मागणी टाकायला त्यांच्या घरी पोहोचले. दोघांच्याही मनात एकमेकांच्या बद्दल भावना असल्याने लगेच चहा पाण्याचा कार्यक्रम उरकून टाकला. जानकी देवीच्या घरात फक्त त्यांची आई आणि लहान बहीण होती. एका अपघातात त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला होता त्यामुळे सर्व घर जानकी देवी सांभाळत होत्या. त्यांच्या आई सुद्धा अंथरुणाला खिळून असायच्या आणि लहान बहीण घरीच असायची.
काहीच महिन्यात लग्नाची तारीख काढली होती. त्यामुळे सर्व कसे अगदी आनंदात चालले होते. ते दोघेही आपल्या सुखी संसाराची स्वप्ने पाहत होते. पण कदाचित त्यांचा हा आनंद देवाला जास्त वेळ टिकवता आला नाही आणि जानकी देवी आणि तिच्या सोबत असणारे अजून एक कर्मचारी ऑफिस मधून घरी परतताना भरधाव येणाऱ्या ट्रकने दोघांनीही चिरडले. दोघांचाही जागीच मृत्यू झाला. जेव्हा राम भाऊ ह्यांना ही गोष्ट कळली तेव्हा ते पार खचून गेले. काही महिने तरी ते ह्या गोष्टीतून बाहेर पडू शकले नाही.
पण घरच्यांनी काही महिन्यांनी त्यांच्या पुढे लग्नासाठी आग्रह करायला सुरुवात केली. त्यांना जानकी सोबत संसार करायचा होता पण आता ते शक्य नव्हते. अशात जानकी देवीच्या आईने त्यांच्या छोट्या मुलीचे स्थळ राम भाऊसाठी सुचवले. आधी राम भाऊंनी खूप विरोध केला पण मग मात्र घरच्यांच्या पुढे त्यांना कमीपणा घ्यावा लागला आणि दोघांचे लग्न लाऊन दिलं. काही महिने तरी राम भाऊ आपल्या बायकोशी धढ बोलले सुद्धा नाही. ते नेहमीच जानकीच्या आठवणीत दंग असायचे. पण त्यांच्या बायकोने कधी एका शब्दात त्यांना ह्या गोष्टीचा जाब विचारला नाही.
सर्वांशी हसत खेळत राहणारी त्यांची बायको वयाने जरी लहान असली तरी खूप कमी वयातच ती समजूतदार झाली होती. जानकी देवीचा हा गुण तिच्यात आला असावा. तिच्या ह्याच स्वभावामुळे राम भाऊ हळूहळू तिच्या स्वभावाच्या प्रेमात पडले होते.जसजसा वेळ पुढे सरकत गेला, त्यांच्या बायकोने सर्वांना आपलेसे करून घेतले. अगदी राम भाऊंचे पान सुद्धा त्यांच्यामुळे पुढे सरकत नव्हते.
पण इथे सुद्धा राम भाऊ कम नशीबी ठरले. त्यांचा संसार फक्त १५ वर्ष चालला आणि त्यांच्या बायकोचे सुद्धा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मुलगा लहान असल्याने त्यांनी दुसऱ्या लग्नाचा विचार सुद्धा केला नाही. पण आजही ते तिच्या आठवणीत जगत आहेत. कारण जगण्यासाठी तिने त्यांना खूप कमी वेळात खूप जास्त चांगल्या आणि अविस्मरणीय आठवणी दिल्या आहेत.
म्हणतात काही लोक आपल्या आयुष्यात अचानक येतात पण आपले आयुष्य सुखदायी करून जातात. म्हणून कधीही कोणत्याही गोष्टी ठरवून चालू नका काही गोष्टी भविष्यावर सोडून द्या. कुणास ठाऊक आपण जो विचार केला असेल त्याच्या दुप्पट आपल्याला मिळू शकेल. ( ही पण कथा वाचा : फुलवा आणि जितूचे अतूट प्रेम वाचा नवीन प्रेम कहाणी)