Home कथा दुसरं लग्न आणि तिचा निर्णय

दुसरं लग्न आणि तिचा निर्णय

by Patiljee
2531 views

आज ती खूप वर्षातून दिसली. सात आठ वर्षांपूर्वी पाहिलेलं तेव्हा ती शाळेतील आठवीच्या वर्गात शिकत होती. मे महिन्याच्या सुट्टीत तिच्या आत्याकडे राहायला आली होती. दोन वेण्या आणि फ्रॉक घालून खेळायला यायची आमच्या सोबत, मी तेव्हा दहावीत असेन. आम्ही तेव्हा खूप खेळायचो अगदी अंधार पडेपर्यंत. त्याचवर्षी तिची आत्या वारली मग पुन्हा ती काय इकडे आलीच नाही, ते दिवस काही वेगळेच होते.

पण तेव्हाची मनी आणि आताची मनी यात खूपच वेगळेपणा आला होता. तीच नाव मनीषा पण आम्ही सर्व तिला मनीच म्हणायचो. मनी दिसायला खूप सुंदर गोरी पान का माहीत नाही पण त्या वेळी ती मला आवडायची. नंतर ती खूप वर्ष आली नसल्याने तिचा विसर पडला होता पण आज अचानक ती समोर आल्यावर पहिल्या आठवणी जाग्या झाल्या. तिने लांबूनच मला पाहिलं आणि जवळ येऊन म्हणाली “महेंद्र मी मनी ओलखलस का मला” “अग हो तुला लांबून पाहिलं तेव्हाच ओळखलं”. महेंद्र तिच्या प्रश्नांना उत्तर देत म्हणाला, “खूप दिवसांनी भेट झाली आणि इतके वर्षा नंतर आत्याकडे आलीस…. “अरे हो आत्या गेली मग इकडे यावस वाटलं नाही पण आता …” शब्द मध्येच तोडत ती महेंद्रला म्हणाली “काय रे तू काय करतोस आता लग्न केलस का नाही… “

महेंद्र थोडासा बावरून म्हणाला, “नाही ग गेल्यावर्षी दोन बहिणीची लग्न उरकली. आता बघू यंदा माझ्या लग्नाचं बघतात घरातली. तीन वर्षांपूर्वी चांगली नोकरी मिळाली सगळं नीट चाललंय आता” मध्येच थांबून महेंद्र म्हणाला “अग घरी चल ना आईला बर वाटेल तुला बघून खूप आठवण काढायची ती तुझी” नको रे आता येईन कधी तरी आता इथेच राहायचं म्हणतेय….. महेंद्र आश्चर्याने म्हणाला का ? म्हणजे अचानक इथे रहाण्याचा बेत कसा ठरला …अरे याच गावात मला शाळेवर शिक्षिका म्हणून रुजू व्हायचं आहे या चार दिवसात…..! म्हणजे मनी तू लग्न नाही केलस आजुन महेंद्रने विचारले ? मनी जड शब्दाने म्हणाली माझ लग्न झालं काय आणि न झाले काय सारखाच.

महेंद्र ने मनीकडे प्रस्नार्थक नजरेने पाहिले दोन महिन्यांपूर्वी माझं लग्न जमले होते खूप खुश होते मी माझे घरचे …….लगेच आठ दिवसात लग्नाची तारीख काढली आणि आमचं लग्न झालं मुलगा खूप शांत वाटला कारण तो जास्त कोणाशी बोलत नव्हता. मला वाटल लग्न झाल्यावर होईल सर्व नीट दुसऱ्या दिवशी सत्यनारायाच्या पूजेची तयार चालू होती सर्व जन आपापल्या कामात व्यस्त. माझी चुलत बहीण होतीच माझ्या सोबत पण तरीही नवीन ठिकाणी खूप एकटे वाटत होते माझा नवरा बाजारातून जाऊन येतो म्हणाला पूजेचा मुहूर्त जवळ आला तरी माझ्या नवऱ्याचा काही पत्ता नाही. म्हणून घरातल्यांनी एक एक करून त्यांना फोन लावायची सुरुवात केली कोणाचाच फोन लागत नव्हतं स्विच ऑफ होता.

सर्व जण बाहेर शोधायला पडली दिवस मावळला सर्व घरी आले, पण माझ्या नवऱ्याचा काहीच पत्ता लागला नाही. सकाळ झाली कोणीच झोपल नव्हत सकाळी सकाळी माझ्या नवऱ्याचा मित्र आला आणि म्हणाला सुधीर त्याच्या एका कॉलेज चा मुलीसोबत पळून गेला. आणि त्यांनी कालच लग्न केल.ं मला तर आभाळ कोसल्यासारख झालं या सगळ्याची कल्पनाच करू शकत नव्हते मी. खोलीत गेले कपड्यांची बॅग भरली तडक बहिणीसोबत माझ्या घरी निघून आले. नंतर माझ्या आई वडिलांनी त्या लोकांवर केस केली कोर्टात आमचं सर्व खर्च त्या लोकांनी भरून दिला…. पण माझं काय माझ्या मनाचा कोणीच विचार नाही केला……!! खूप त्रास झाला … अजूनही विसरले नाही ते सर्व पण ते सर्व मागे टाकून आता पुढे जायचे ठरवले आहे.

माझं बी एड झालं होत आणि आता शाळेवर पण लागले जाऊदे झालं ते झालं “अरे बापरे खूप वेळ झाला चल मला जायला हवं शाळेत जाऊन हेडमास्तर आणि शिक्षकांची भेट घ्यायची आहे. मनी निघून गेली पण महेंद्रच्या मनात विचारांनी गोंधळ मांडला होता. इतक्या सुंदर आणि चांगल्या मुलीच्या बाबतीत असे घडू शकते यावर त्याचा विस्वासच बसत नव्हता….. विचार करता करत भूतकाळात गेला लहान असताना सर्व मित्र मैत्रिणी आम्हा दोघांना नवरा बायको म्हणून चिडवायचे का माहीत नाही पण त्यांचं ते चिडवण मला खूप आवडायचे….पण आताची मनी आणि तेव्हाची मनी यात खूप फरक होता.

शेवटी त्याने विचार केला… आपणच मनिला लग्नासाठी मागणी घातली तर तिला आवडेल का ती हो म्हणेल का मला??? जाऊदे काही करून उद्या तिच्या घरी जाऊन भेटून मी तिच्याशी या गोष्टीवर बोलेन मला मनातून वाटतेय ती मला नाही म्हणणार नाही कारण त्यावेळी तिला मी नवरा म्हणून चिडवलेल आवडायचं. महेंद्र घरी आला, त्याच्या मनात एकच विचार घोळत होता की मनिसोबत लग्न करायचे बस. मनीला विचारायचे होतेच पण आधी घरातल्यांची पण सहमती महेंद्रला घ्यायची होती. दोन्ही पण गोष्टी खूप अवघड होत्या कारण घरात जर समजले की तिचे अगोदर लग्न झाले आहे आणि हे तिचं दुसरे लग्न आहे, तर घरातल्यांची परवानगी मिळणे अवघड होते.

तिकडे मनी आधीच एका लग्नाच्या त्रासातून बाहेर आली होती, त्यात परत तिला लग्नासाठी तयार करणे खूप कठीण काम होते. महेंद्र खरंच कोड्यात सापडला होता, कसे होणार ? काय करू? कसे विचारू? असे असंख्य प्रश्नांनी त्याचे डोके भंडावून सोडले होते. त्यातच आईचा आवाज त्याच्या कानावर आला. मार्केट मधून आई घरी आली होती. हातातले सामान खाली ठेवताच आई म्हणाली अरे मनी आलीय आपल्याच गावात शिक्षिका म्हणून, भेटली का तुला?, मी फक्त होकारार्थी मान हलवून गप्प उभा राहिलो. तेवढ्यात आईने विचारले की बाळा आता तुझे वय वाढत आहे यावर्षी लग्नाचं बघायलाच हवं. आणि मला राहून राहून एक विचार मनात आले तुझ्यासाठी मी एक मुलगी सुचवली आहे लग्नासाठी मला वाटतेय तुला तिच्याशी लग्न करायला आवडेल.

“तू कोणाबद्दल बोलतेस आई ,….! अरे मनिषा आपली मनी फारच गोड पोर हाय ती. आईचे हे बोलणे ऐकून माझा आंदण गगनात मावेनासा झाला.” कारण जी गोष्ट मला आईला विचारायची आहे, तीच गोष्ट आई स्वतः मला विचारत आहे. हे ऐकूनच इतका खुश झालो की जाऊन आईला मिठी मारली. आई खरंच मनी सोबत मला संसार करायला खूप आवडेल पण अगोदर तिची काय इच्छा आहे हे पण पाहायला पाहिजे. आई म्हणाली तू नको काळजी करू आपण तिच्या घरच्याशी बोलू आणि मी आहे ना मी बोलेन तिच्याशी. महेंद्रला आता कधी एकदा मनीला जाऊन भेटतोय आणि जे काय आहे ते सांगून टाकतो असे झालेले.

महेंद्रला इतका आनंद झाला होता की तो फक्त नाचायचं शिल्लक होता. आता फक्त प्रश्न होता मनिषाच्या होकाराचा. दुसऱ्या दिवशी महेंद्र सकाळी लवकर उठून शाळेत आला. एवढ्या सकाळी सकाळी महेंद्रला समोर बघून मनीषा पण थोडी विचारत पडली. “काय रे आज सकाळी सकाळी शाळेकडे कसं येन केलेस??” तिने गमतीने त्याला विचारले. त्याने पण हसत हसत म्हटले “अग तुझ्याचसाठी आलो आहे” ती थोडी कोड्यात पडली. त्याने तिला सांगितले की आज संध्याकाळी मला भेट तुझ्याशी महत्वाचे काम आहे. आणि तो निघून गेला.

मानिषाच्या मनात मात्र असंख्य प्रश्नांनी घर केले होते. दिवसभर तिच्या मनात हेच चालू होते. शाळेचा पहिला दिवस असताना सुद्धा तिचे मन लागत नव्हते. ठरल्या प्रमाणे मनिषा महेंद्र ला ठरलेल्या ठिकाणी भेटायला आली. तो आधीपासूनच तिथे बसला होता. महेन्द्र काय इतकं महत्त्वाचं सांगायचे आहे की लगेच मला भेटायला बोलावलेस?? अग मनी बस तर आधी इथे मग बोलूच आपण. ती त्याच्या समोर जाऊन बसली. हा बोला काय काम होत सरकार तुमचे.

महेंद्रला कसे सांगायचे काही कळत नव्हते पण शेवटी मन घट्ट करून तो तिला म्हणाला “हे बघ मनिषा तुझ्या आयुष्यात जे झालं त्यात तुझी काहीच चुकी नव्हती. पण यापुढे तू तुझ्या पुढच्या आयुष्याचा विचार करायला हवास असे मला वाटते…..” एकदा कोणा एकाला संधी तर देऊन बघ ग, सर्वच मुले सारखी नसतात. तू पुन्हा लग्नाचा विचार परत एकदा करावा असे मला वाटते” हे ऐकुन मात्र मनिषा भडकली, ती लगेच त्याचे वाक्य तोडत म्हणाली हे बघ माझ्यासमोर परत त्या लग्नाचा विषय काढू नकोस. एकदा मी त्यातून गेली आहे त्यामुळे काय त्रास होतो हे माहीत आहे मला… हे असे न सांगता आणि माझी काहीच चूक नसताना तो मला सोडून गेला.

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी काय अवस्था झाली असेल माझी आणि त्यातून मी मला कसं सावरलं हे माझे मला माहित. तेव्हाच संपवणार होते मी स्वतःला पण मग आई बाबांचा विचार मनात आला आणि विचार केला की जाऊदे ह्या असल्या व्यक्तीसोबत आयुष्य काढण्यापेक्षा आपण एकटे राहिलेलं बर. आणि यापुढे माझ्यामध्ये आणखी धक्के सहन करायची शक्ती नाही उरली… परत लग्नाचा विषय काढू नकोस. नाहीतर कदाचित मी मित्र म्हणून सुद्धा तुझ्याशी बोलू शकणार नाही. एवढे बोलून ती रागात निघून गेली. महेंद्र ला त्याची बाजू मांडण्याची संधी मिळाली नाही. तो तसाच घरी निघून गेला.

सोफ्यावर गप्प बसून महेंद्र विचार करत बसला होता आई ने त्याची तंद्री उडवली …बाळा काय झाले? का गप्प आहेस? तेव्हा त्याने मनी आणि त्याच्यात जे संभाषण झाले ते आईला सांगितले. आईने तिच्या घरी जायचे ठरवले. ठरल्याप्रमाणे संध्याकाळी आई तिच्या घरी गेली. मनीने महेंद्राच्या आईला पाहिले, लगेच उठून बाहेर आली. काकू तुम्ही या ना बसा….मनिषा काय झाले ग बाळा तुला का भांडली तू महेंद्र सोबत? आईने विचारले. काही नाही वो काकू असेच थोड. या तुम्ही बसा मी तुम्हाला चहा टाकते.

चहा घेता घेताच आईने विचारले “मनिषा काय झाले ? का तु आपले आयुष्य असे मन मारून जगनार आहेस. लग्नाचा विचार कर पोरी… या आताच्या जगात एकट्या बाईचा फायदा घ्यायला तिचे लचके तोडायला लांडग्याची कमी नाही…कोणाची सोबत असेल तर आयुष्याला योग्य दिशा मिळते” मनिला आता आईचे म्हणणे थोडे का होईना पटायला लागले होते पण तिचे मन तिला साथ देत नव्हते…नाही काकू आता माझी इच्छाच राहिली नाही पुन्हा लग्न करायची आणि जरी मी लग्न करण्याचा विचार केला तरी माझ्याशी कोण लग्न करेल सांगा ना? एकतर माझे असे झाले आहे त्यात जर चुकून सुद्धा मुलगा मिळाला तर तो सुद्धा तसेच वागला तर माझे काय होईल. म्हणून या परस्थितून मला परत जाण्याची भीती वाटत आहे.

हे बघ मनी माझा महेंद्र तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. आणि तुझे लग्न झाले आहे अगोदर हे मला माहीत आहे. आणि तू महेंद्र ला लहानपणापासून ओळखतेस ना तुला वाटतेय का की तो तुला त्रास होईल असे वागेल माझी तर पूर्ण समती आहे या लग्नाला, राहिला प्रश्न महेंद्रच्या बाबांचा तर त्यांना मी समजावेन. फक्त तू लग्नाला होकार दे अग तो तुझ्या होकाराची वाट बघतोय त्याला आता तुझ्यासोबत आयुष्य काढायचं आहे म्हणतोय काय सांगू मी त्याला….तूच बोल पोरी मनिशाने डोळ्यातील पाणी कसे बसे पुसले. खरेतर तिला सुद्धा पुन्हा आयुष्य नव्याने जगायचे होते इतर स्त्रियांप्रमाने संसाराच्या वेलीवर फुलायचे होते.

तिच्या चेहरा लाजेन लालबुंद झाला होता ओठावर खूप दिवसांनी का होईना स्मित हास्य उमटले होते… कारण आता तिलाही लग्नाच्या बेडीत अडकली होते…. तिने मान हालवून होकार दिला आईने आनंदाने मनुला मिठी मारली……कधी एकदा ही आनंदाची बातमी महेंद्र ला सांगते असे झालेले ती घाईघाईत घराकडे निघाली…

लग्न या विषयावर या सुद्धा कथा वाचा

समाप्त

कथेचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत, लेखकाच्या नावासोबत कथा शेअर करायला हरकत नाही.

लेखक : पाटीलजी (आवरे उरण)

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल