Home संग्रह जबेल अली दुबईमध्ये सर्वात मोठं हिंदू मंदिर उभारले जातेय

जबेल अली दुबईमध्ये सर्वात मोठं हिंदू मंदिर उभारले जातेय

by Patiljee
172 views

आपल्या हिंदू धर्मात आपण अनेक मंदिरात जाऊन दर्शन घेतो. तिथे गेल्यावर एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा मनी संचारते. जणू जगण्याची नवी उमेद आपल्याला मिळते. आपण भारतातील अनेक हिंदू मंदिरांना भेट दिली असेल पण आज आम्ही तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहोत जे ऐकुन तुमची छाती अभिमानाने भरून येईल. दुबई मधील जबेल अली मध्ये हिंदूचे भलेमोठे मंदिर उभारले जाणार आहे. हे मंदिर २५,००० चौरस फूट असेल. ह्याच्या बांधकाम ह्याच वर्षी म्हणजे २०२० मध्ये सुरुवात होणार आहे.

तिथे असलेले सिंधी गुरु दरबार ह्याचाच भला मोठा विस्तार होणार आहे अशी घोषणा राजू श्रॉफ ह्यांनी केली. त्यांच्यामते इथल्याच गुरु नानक दरबाराला लागून हे मंदिर असणार आहे. एकदा ते तयार झाल्यावर इथे चर्च आणि मंदिरे असतील. २०२२ पर्यंत ह्या मंदिराचे कामकाज पूर्ण होईल असे आश्वासन श्रॉफ ह्यांनी बोलताना दिले. सिंधी गुरु दरबार मंदिराच्या सदस्यांनी ह्या मंदिराचे भूमिपूजन मागच्याच आठवड्यात केलं आहे.

महत्त्वाचे म्हणजे ह्या मंदिराला ७५ दशलक्ष डॉलर्स धिरम म्हणजेच ४८ करोड ७१ लाख एवढं खर्च करणार आहेत. टेंपल आर्किटेक्चर ह्या भारतीय कंपनीला ह्या मंदिराचे आर्किटेक्चर करण्याचे कामकाज सोपवले आहे. ह्या कंपनीने आजवर जगभरात दोनशेहून अधिक मंदिरे उभारली आहेत. ह्या मंदिराची बांधण्याची परवानगी दुबई समुदाय विकास प्राधिकरणाकडून आधीच घेण्यात आली आहे. फक्त दुबई नगरपालिकेची परवानगी अजुन बाकी आहे. ती एकदा मिळाली मी अधिकृतपणे बांधकामाला सुरुवात होईल असे श्रॉफ ह्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

तिथे स्थायिक असलेले सध्याचे मंदिरात अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यांची अनेकदा गैरसोय होते, पार्किंगची समस्या भेडसावते. म्हणूनच हे मंदिर उभारण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल