रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील कला, क्रीडा, सांस्कृतिक, शैषणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रसिद्ध द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन मार्फत आवरे गावातील नवोदित लेखक महेंद्र गुरुनाथ पाटील यांना द्रोणागिरी भूषण पुरस्कार २०२२ ने मंगळवार दिनांक २० डिसेंबर २०२२ रोजी सन्मानित करण्यात आले.

दरवर्षी होणाऱ्या या यंदाच्या २२ व्या महोत्सवात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जातो. यावेळी सुद्धा विविध क्षेत्रातील ३५ व्यक्तींना हा पुरस्कार दिला गेला. आपल्या लेखणीने सर्वांना मंत्रमुग्ध करणारे लेखक म्हणून ओळख असलेले कथाकार महेंद्र पाटील यांना सुद्धा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

महेंद्र पाटील हे सोशल मीडियावर पाटीलजी या नावाने प्रचलित आहेत. आजवर त्यांनी ६३२ मराठी कथांचे लेखन केलं आहे. प्रेम कथा लिहिण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांच्या अनेक कथांवर शॉर्ट फिल्म बनल्या आहेत. लवकर एका OTT प्लॅटफॉर्मवर त्यांनी लिहिलेली वेब सिरीज सुद्धा येणार आहे.