Dream 11 ने बाजी मारत सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. काहीच दिवसांपूर्वी बीसीसीआयने आयपीएल २०२० च्या हंगामातील प्रायोजकत्व (स्पॉन्सर) काढून घेतलं होतं. अशा त आयपीएल साठी नवीन स्पॉन्सर कोण असणार असा मोठा प्रश्न निर्माण झाला होता.
ह्या रेस मध्ये अनेक मोठमोठ्या कंपनी होत्याच पण अखेर Dream 11 ने बाजी मारत प्रायोजकत्व मिळवलं. आयपीएल चा तेरावा हंगाम दुबईमध्ये १९ सप्टेंबर पासून सुरू होतोय. ह्या हंगामात आता आपल्याला खेळाडूंच्या जर्सी आणि इतर बऱ्याच ठिकाणी ड्रीम ११ चे नाव पाहायला मिळेल.
भारत आणि चीन ह्या देशांचे सध्या मोठ्या प्रमाणात बिनसले असल्याने बीसीसीआयने आयपीएल मधील विवो (Vivo) असलेला स्पॉन्सर सर्वांच्या निर्णयाने काढून टाकण्यात आला. ह्यासाठी बीसीसीआयने विवाे कंपनीला ४४० कोटी द्यावे लागले. कारण ह्या अगोदर २०१७ मध्ये विवो ने २१९९ कोटी मध्ये स्पॉन्सरशिप तीन वर्षासाठी मिळवली होती.

पण आता हीच स्पॉन्सरशिप ड्रीम ११ च्या ताफ्यात आल्याने त्यांचे शेयर नक्कीच वाढवतील ह्यात काही शंका नाही. ह्यासाठी त्यांना २२२ कोटी एवढी मोठी रक्कम मोजावी लागली. पण महत्त्वाचे म्हणजे हा करार फक्त एकाच वर्षा पुरता असणार आहे.
कथा वाचायची आवड असल्यास ही कथा वाचा कॉल गर्ल