Home हेल्थ दोन्ही हातानी वाजवा टाळी आणि बघा काय फायदा होतो आपल्या शरीराला

दोन्ही हातानी वाजवा टाळी आणि बघा काय फायदा होतो आपल्या शरीराला

by Patiljee
592 views

मित्रांनो आपण टाळी केव्हा वाजवतो? जेव्हा एखाद्या व्यक्तीला त्याच्या केलेल्या चांगल्या कृत्या बद्दल त्याचे अभिनंदन करताना आपण नेहमीच टाळी वाजवतो, किंवा भजन किंवा आरती म्हणताना ही आपण हातानी टाळी वाजवत असतो. पण टाळी वाजवल्याने मिळतात आपल्या शरीराला अनेक फायदे हे तुम्हाला माहीत आहे का ? नाही ना मग जाणून घ्या. आपल्या हातात जे प्रेशर पॉईंट आहेत त्यामुळे टाळी वाजवली असता हे फायदे आपल्याला मिळतात.

हाताच्या तळव्यात एकूण २९ प्रेशर पॉईंट असतात आणि हे प्रेशर पॉईंट शरीराच्या वेगवेगळ्या भागांना जोडलेले असतात. त्यामुळे टाळी वाजवली असता तुमच्या शरीराला त्याचा उपयोग होतो.

सकाळी उठल्यानंतर जवळ जवळ २० मिनिट तरी हा प्रयोग करा. त्यामुळे तुम्हाला याचा फायदा जास्त मिळेल. त्यामुळे तुमच्या शरीरातील रक्तप्रवाह व्यवस्थित होईल.

रोज तुम्ही टाळ्या वाजवल्यास तुमच्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि त्यामुळे तुमचे वेगवेगळ्या आजारांपासून रक्षण होते.

ज्या व्यक्तींना उच्च रक्तदाब आणि निम्न रक्तदाब या समस्या आहेत त्यांनी हा प्रयोग नक्की करून बघा. कॉलेस्ट्रॉल ही नियंत्रण मध्ये राहते.

पचनसंस्था योग्य रीतीने कार्य करते त्यामुळे बद्धकोष्ठ सारखी समस्या तुमच्यापासून लांब राहील.

तुम्हाला जर संधिवाताचा त्रास होत असेल तर रोज सकाळी टाळ्या वाजवा त्यामुळे तुमची ही समस्या नक्की दूर होईल.

टाळी वाजवल्यास तुमच्या शरीरातील साखरेचे प्रमाण ही नियंत्रित राहते त्यामुळे मधुमेही लोकांसाठी हा अत्यंत सोपा उपाय असू शकतो. शिवाय यामुळे तुमचे वजन ही आटोक्यात येते.

तुम्हाला जर मानसिक ताण तणाव असेल तर तुम्ही रोज टाळी वाजवा त्यामुळे नक्कीच तुमच्या मनावर याचा चांगला परिणाम होतो.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल