Home संग्रह डोनाल्ड ट्रंप ह्यांची बायको आहे त्यांच्या २४ वर्ष लहान, वाचा ह्या दोघांबद्दल अजून बरंच काही

डोनाल्ड ट्रंप ह्यांची बायको आहे त्यांच्या २४ वर्ष लहान, वाचा ह्या दोघांबद्दल अजून बरंच काही

by Patiljee
143 views

डोनाल्ड ट्रंप आणि मेलानिया सध्या भारत दौऱ्यावर आहे. सर्वात मोठ्या देशाचा ताकदवर माणूस आपल्या देशात आलंय म्हटल्यावर नेटकरी भरभरून शुभेच्छा देत आहेत तर काही ट्रोल करत आहेत. अनेक फोटोंचे मीम्स ऑनलाईन वायरल होत आहेत. ह्या आधीही डोनाल्ड ट्रंप २०१३ मध्ये भारतात आले होते पण तेव्हा ते एक व्यापारी होते पण सध्या ते अमेरिकेचे राष्ट्रपती आहेत. त्यांची पत्नी मेलानियाची भारतात येण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यांचा उत्साह ह्या गोष्टींवरूनच दिसून येतो की भारतात पोहोचल्या पोहोचल्या त्यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केले की ह्या दौऱ्यावर आम्ही येण्यासाठी खूप उत्साही आहोत.

२०१६ मध्ये डोनाल्ड ट्रंप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले. त्यांची पत्नी म्हणजेच मेलानिया अगोदर एक सुपरमॉडेल राहिली आहे. फर्स्ट लेडी म्हणून त्यांची अमेरिकेत ओळख आहे. मेलानिया आणि डोनाल्ड ट्रम्प ह्यांची लव स्टोरी सुद्धा खूप मजेदार आहे. स्‍लोवेनिया ह्या देशाची ती सुपरमॉडेल झाली होती. ट्रंप ह्यांची ती तिसरी पत्नी आहे. १९९६ पासून त्या अमेरिकेत वास्तव्यास आहेत आणि त्यांना २००६ मध्ये अमेरीचे नागरिकत्व मिळालं होते. १९९८ न्यूयॉर्क मध्ये एका फॅशन शो मध्ये ह्या दोघांमध्ये ओळख निर्माण झाली.

ज्या वेळी हे दोघं भेटले होते तेव्हा ट्रंप ५२ वर्षाचे होते आणि मेलानियाचे वय २८ वर्ष होते. त्याच भेटीत एकमेकांचे नंबर घेण्यात आले आणि एका आठवड्यात दोघेही डेटवर गेले. ह्या दोघांच्या प्रेमाचे किस्से तेव्हा अमेरिकेत खूप जास्त प्रचलित होते. १.५ मिलियन डॉलरची अंगठी देऊन ट्रम्प ह्यांनी मेलानिया लग्नासाठी विचारलं होतं. २००४ मध्ये जेव्हा दोघांनी साखरपुडा केला तेव्हा त्यांचे नाते जगासमोर आलं.

२२ जानेवारी २००५ मध्ये दोघांनीही लग्न केले. मेलानिया हिला पाच भाषा बोलता येतात. ह्यात इंग्रजी, सर्बियन, फ्रेंच, जर्मन आणि स्लोवेनियन भाषांचा समावेश आहे. ती ट्रम्प यांच्यापेक्षा वयाने २४ वर्ष लहान आहे. आपल्या लग्नात मेलानियाने २,००,००० अमेरिकन डॉलर किमतीचा ड्रेस घातला होता. हा ड्रेस प्रसिद्ध डिझायनर क्रिश्चिश्‍न डियॉर ह्यांनी साचेबद्ध केला होता. २००६ मध्ये त्यांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला आणि त्याचे नाव बैरन ट्रम्प आहे.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल