डॉक्टरांना देवाचेच दुसरे रूप मानले जाते ही ओळ पुन्हा एकदा खरं करून दाखवली आहे एका डॉक्टरने. तर ही गोष्ट घडली आहे चीन मधून अमेरिकेला जाणाऱ्या विमानामधे यामध्ये एका डॉक्टरने एका वयस्कर व्यक्तीचे प्राण वाचवले आहे. आश्चर्य चकित करणारी गोष्ट अशी आहे की, या डॉक्टरने या वयस्कर व्यक्तीचे प्राण वाचवण्यासाठी अर्धा तासा पेक्षा जास्त काळ त्याने मूत्राशय मधून मूत्र ओढून बाहेर काढले.
लघवी न केल्याने बिघडली होती या वयोरुद्ध व्यक्तीची तब्बेत. हा म्हातारा व्यक्ती चीन मधील एका विमानाने चीन मधून न्यूयॉर्क जाण्यासाठी या विमानामध्ये बसला होता. ज्या ठिकाणी जायचे होते तिथे पोहचण्यासाठी अजूनही 6 तास बाकी होते आणि त्यांची तब्बेत बिघडली यातच क्रू मेंबर्स यांना त्या व्यक्तीची लवकरात लवकर कल्पना करून दिली कारण त्या व्यक्तीचं लवकरच योग्य त्या ट्रीटमेंटची गरज होती.
त्या विमानातील लोकांनी पाहिले तर त्या म्हाताऱ्या व्यक्तीचं संपूर्ण शरीर घामाने भिजल होता. त्यानंतर विमानातील एका क्रू मेंबर्स याने त्या म्हाताऱ्या व्यक्तीसाठी पायलटच्या केबिन जवळ एक बेड आणून ठेवला. मदत मिळण्या करिता विमानातील क्रू मेंबर्स यांनी प्रवाशांना विचारले की कोणी डॉक्टर आहे का की जो यावेळी मदतीला येऊ शकेल याच विमानात डॉक्टर झांग हे पेशंट साठी मदतीला आले.
त्या वयस्कर व्यक्तीला चेक केल्यानंतर डॉक्टर झांग यांना कळाले की हा व्यक्ती लघवीला जाण्यास असमर्थ आहे त्यामुळे याला लघवीच्या जागी जवळ जवळ एक लिटर इतके मूत्र साचले आहे. जर जा हे मूत्र लगेच बाहेर नाही काढले याचे मूत्राशय फुटून हा प्रवाशी लगेच प्राण सोडेल. आता त्या गोष्टीसाठी लागणारे सामान लगेचच हे डॉक्टर झांग यांच्याकडे उपलब्ध नव्हते त्यामुळे त्यांनी विमानातील काही मेडिकल किट घेतले आणि त्यांनी एक ऑक्सीजन मास्क, एक सिरिंज, टेप आणि दुधाची बाटली यांचा उपयोग केला.
तसेच डॉक्टर झांग यांनी मूत्र काढण्यासाठी सिरिंजचा उपयोग केला पण हे ही असफल झाले. त्या व्यक्तीचा मूत्राशय इतका फुगला होता की, जरासा ही दबाव पडला असता त्याच्या मूत्राशयाच्या लगेच हानी झाली असती. त्यामुळे दुसरा कोणताच उपाय नसल्या कारणाने डॉक्टर झांग यांनी आपल्या तोंडाने त्या व्यक्तीचे मूत्र बाहेर काढण्याचा निर्णय घेतला.

यासाठी त्यांनी एक कप आणि पाईप नळी यांचा उपयोग केला त्यानंतर डॉक्टरांनी पुढच्या 37 मिनिटांत त्या व्यक्तीचा 700 ते 800 मिली लिटर मूत्र तोंडाने ओढून बाहेर काढले. आणि त्या व्यक्तीचा जीव वाचवला. न्यू यॉर्क मध्ये पोहचल्यावर त्या व्यक्तीला लगेच हॉस्पिटल मधे अनेक गेले तिथं त्यांच्यावर उपचार चालू आहेत.