मित्रानो दिवाळी सुरू झाली की आपल्याला वेध लागतात ते फटाक्यांचे पण यापेक्षाही अजुन खुप काही घेऊन येते ही दिवाळी हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत नसेल ही..!! तर दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजेच नरक चतुर्दशी या दिवसाला छोटी दिवाळी असेही म्हणतात. आज आपण नरक चतुर्दशी बद्दल माहिती करून घेणार आहोत.
नरक चतुर्दशी म्हणजे नक्की काय ते पाहूया.
दरवर्षी अश्विन कृष्ण चतुर्दशीला नरक चतुर्दशी येते. या दिवशी पहाटे म्हणजे सूर्योदयापूर्वी लवकर उठून अंगाला सुगंधित उटणे, तेल लाऊन अभ्यंग स्नान केले जाते कारण त्यामुळेच आपल्या शरीरातील नरक रुपी पाप वासनांचा आणि अहंकाराचा नायनाट होतो. पण आता याला नरक चतुर्दशी असे का म्हणतात हे तुम्हाला माहीत आहे का? कोणी म्हणेल की हो या दिवशी नरकासुराचा वध झाला म्हणून त्यास नरक चतुर्दशी असे म्हणतात.. हो हे खरे आहे..!! पण त्या मागील पूर्ण कहाणी तुम्हाला माहीत आहे का ? बऱ्याच जणांना कदाचित माहीत ही नसेल म्हणून मग पुढे वाचा काय आहे नक्की या दिवसाचं महत्त्व?
विष्णु देवाने जेव्हा पृथ्वीच्या उद्धारासाठी वराह अवतार घेतला त्यावेळी पृथ्वीच्या गर्भातून असुरासुराचा जन्म झाला !! असुरा सुर हा विष्णूचा पुत्र होय तो एक प्रसिद्ध दानव होता. जेव्हा रावणाचा मृत्यू झाला तेव्हा पृथ्वीच्या गर्भातून नरकासुराचा जन्म झाला. नरकासुराचा जन्म त्याच स्थळी झाला होता जिथे सीतेचा जन्म झाला होता, त्यामुळे राजा जनक यांनी नरकासुराचा सांभाळ केला. त्यानंतर पृथ्वी त्याला विष्णु देवाकडे घेऊन गेली. विष्णूने त्याला एका राज्याचा राजा बनवले. नरकासुर हा कंसाचा मित्र होता.
विदर्भाची राजकुमारी माया हिच्याशी त्याने विवाह केला. त्यावेळी विष्णु ने त्याला दुर्मिळ असा वर दिला. त्यानंतर नरका सुराने अधर्माने वागायला सुरुवात केली. आपल्या ताकदीचा उपयोग करून तो देवांना त्रास देऊ लागला!! आणि म्हणून ऋषी वशिष्ठ यांनी त्याला विष्णुच्या हातून तुझा वध होईल असा शाप दिला”.. या शापातून मुक्ती मिळण्यासाठी नरका सुराने कठोर तप सुरू केले.. त्यातून त्याला ब्रह्मदेव प्रसन्न झाले!! ब्रम्हदेव यांच्याकडून त्याने कुणाकडूनही माझा वध होऊ नये असा वर मागून घेतला.आणि त्यामुळे तो अधिक मजला होता. अनेक राजाच्या कन्या आणि स्त्रिया यांचं अपहरण करून आपल्या राज्यात डांबून ठेवल्या.
अशा एकूण सोळाहजार शंभर स्त्रियांना त्याने डांबून ठेवले.. अशा रीतीने तो त्याला मिळालेल्या वरदाणाचा फायदा घेऊन अनेक देवांना, वसूना , ऋषींना , राजांना त्रास देऊ लागला याच जाचाला कंटाळून देवांनी विष्णुची उपासना केली..विष्णूने कृष्णाचे रूप धारण करून नर्कासुरावर आक्रमण केले आणि यात नरकासुराचा वध झाला..त्यानंतर नरकासुराच्या बंदिवासात असणाऱ्या त्या सोळा सहस्त्र स्त्रियांची सुटका केली. पण या स्त्रियांना त्यांची कुटूंबे आता स्वीकारणार नाहीत हे जाणून घेऊन मग श्री कृष्णाने त्या सोळा सहस्त्र स्त्रियांशी लग्न केले आणि त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिलऊन दिली.
कृषाच्या सोळा सहस्त्र बायका होत्या असा जो काही अप प्रचार केला आहे तो साफ चुकीचा आहे. कृष्णाने केलेले हे काम धर्माला अनुसरून होते. आणि म्हणून त्या दिवसाला नरक चतुर्दशी साजरी केली जाते. नरकासुराच्या वधा नंतर श्री कृष्णाच्या अंगावर जे काही रक्त उडाले होते त्यामुळे श्री कृष्णाने त्यासाठी तेरावे स्नान केले आणि म्हणूनच या दिवशी अभ्यंग स्नान करण्याची परंपरा सुरू झाली.
©All Rights Reserved Readkatha