सध्या सर्वत्र एकाच सिनेमाची जोरदार चर्चा आहे. सुशांत सिंग राजपूत आणि संजना सांघी ह्यांची मुख्य भूमिका असणारा दिल बेचारा सिनेमा सर्वांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाला आहे. सुशांत सिंग राजपूत ह्याच्या मृत्यूनंतर त्याचा हा सिनेमा चाहत्यांसाठी त्याची शेवटची आठवण होती.
म्हणूनच हॉटस्टार ने सुद्धा हा सिनेमा आपल्या प्लॅटफॉर्मवर फ्री मध्ये लोकांसाठी प्रदर्शित केला. ह्या सिनेमात सुशांत आणि संजनाच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे तर इतर साईड अभिनेत्यांचेही कौतुक होत आहे.खास करून ह्या सिनेमात संजणाच्या आईच्या भूमिकेत असणारी अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जी हीचा अभिनयाची लोकांनी खूप प्रशंसा केली आहे.
स्वस्तिका ह्यांनी ह्या सिनेमात मिसेज बासू हे पात्र साकारले आहे. ह्या पात्रात त्यांनी कधी कठोर तर कधी प्रेमळ आईची भूमिका साकारली आहे. पण त्यांचा हॉट अंदाज सुद्धा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

तुम्हाला हा चेहरा नक्कीच ओळखीचा वाटत असेल? कुठे पाहिले अगोदर ह्या अभिनेत्रीला असे तुम्हीही विचारात पडले असाल? तर उत्तर अगदी सोपे आहे. काहीच दिवसांपूर्वी एका वेब सिरिजने तुफान यश संपादित केले होते. त्या वेब सिरिजचे नाव आहे पाताळ लोक. ह्या सीरिज मध्ये तिने डॉली मेहरा हे पात्र साकारले होते. मराठी मधील आरॉन ह्या सिनेमात सुद्धा त्या आपल्याला दिसल्या होत्या.

आपल्या अभिनयाची सुरुवात तिने देवदासी ह्या बंगाली मालिकेपासून केली होती. तर २००१ मध्ये हेमंतर पाखी ह्या सिनेमातून तिने सिने सृष्टीत पदार्पण केले होते. २००८ मध्ये आपण त्यांना २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या मुंबई कटिंग मध्ये पाहिले आहे. वयाच्या अवघ्या १८ वर्षात म्हणजेच १९९८ मध्ये त्यांचं लग्न झालं होतं. पण हे लग्न फक्त २ वर्ष टिकले आणि ते विभक्त झाले.

आपल्या सोशल मीडियावर नेहमीच आपले हटके फोटोज् पोस्ट करून त्या प्रकाशझोतात येत असतात. तुम्हाला त्यांचा दिल बेचारा मधील अभिनय कसा वाटला आम्हाला नक्की सांगा.
मनोरंजन क्षेत्रातील ह्या बातम्या सुद्धा वाचा
- ह्याच आठवड्यात अभिनेता नितीन करतोय ह्या मुलीसोबत लग्न
- जेनेलिया वहिनी बद्दल ह्या गोष्टी माहीत नसतील तुम्हाला
- तमिळ अभिनेता आर्याची पत्नी सुद्धा आहे साऊथ मधील नामांकित अभिनेत्री