म्हणतात ना प्रेमापुढे कोणाचे काही चालत नाही असेच प्रेम केले या दोघांनी. दक्षिण सिनेमाचा सुपरस्टार धनुष आणि दिग्दर्शक ऐश्वर्या. साऊथचा अभिनेता रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या हिने धनुष्य सोबत प्रेम तर केले आणि ते पूर्णत्वास ही आणले. धनुष्यला पहिल्या भेटीत तिने आपल्या दीलाचा राजकुमार करून घेतले होते. साऊथच्या प्रत्येक सिनेमात अगदी साधी राहणीमान करणारा धनुष्य दिसायला ही साधा भोळा तिच्या मनाला भावून गेला होता. ऐश्वर्या आता साउथ सिनेमा याची निर्देशिका आहे. धनुष्य आणि ऐश्वर्या या दोघांचे लग्न हे 2004 ला झाले. ऐश्वर्या आपल्या वडिलां प्रमाणे अभिनया मध्ये तशी खास नाही आहे पण निर्देशिका म्हणून उत्कृष्ट आहे. तिने कितीतरी टीव्ही शोज मध्ये जज म्हणून काम केले आहे.

धनुष्य यांनी एका मुलाखतीमध्ये त्यांच्या पहिल्या भेटीत काय काय झाले ते सांगितले आहे. धनुष्यचा पहिला सिनेमा काढाल कोंडे याचा पहिला शो होता. त्या दिवशी ते सर्वजण संपूर्ण कुटुंब सह हा सिनेमा पाहत होते. त्यानंतर सिनेमा संपल्यानंतर सिनेमाचे मालक यांनी रजनीकांत यांच्या मुलीशी सगळ्याची भेट घातली. त्यात धनुष्य ही होता. तीच नाव ऐश्वर्या पण पहिल्या भेटीत धनुष्य आणि तिने दोघांनीही एकमेकांना फक्त हाय हॅलो इतकचं केले.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी ऐश्वर्या हिने धनुष्य यांना एक बुफे पाठवला आणि त्यावर लिहल होत “गूड वर्क” आणि त्या दिवसापासून दोघांचेही मैत्री वाढू लागली. वयाने दोन वर्ष मोठी असणाऱ्या ऐश्वर्या हिच्यावर धनुष्य मनापासून प्रेम करत होता. दोन वर्ष त्यांच्या प्रेमाला झाल्यावर त्या दोघांनी लग्न ही केले. कारण दोघांचं प्रेम प्रकरण आता सगळ्यांना समजलं होत. म्हणून मग घरच्यांनीच त्यांचं लग्न जमवलं त्या दोघांचे लग्न झाले तेव्हा धनुष्य 21 वर्षाचा आणि ऐश्वर्या हिचे वय 23 वर्षाचे होते. दोघांच्या ही लग्नाला आता 15 वर्ष झाली आहेत शिवाय त्यांना दोन मुलंही आहेत आणि आनंदानी संसारही करत आहेत.