अंजली, देव आणि राम ही नावे आजही सर्वांच्या मनात घर करून आहेत. ११ ऑगस्ट २००० मध्ये प्रदर्शित झालेला धडकन हा सिनेमा आजही त्याच्या कथेसाठी आणि चित्रपटातील गाण्यांसाठी ओळखला जातो. चित्रपटातील गाणी आजही आपण ऐकताना मंत्रमुग्ध होतो. चित्रपटात शिल्पा शेट्टी, सुनील शेट्टी आणि अक्षय कुमार ह्यांनी आपल्या अभिनयाने ह्या सिनेमात चार चांद लावले होते.
सिनेमाचे दिग्दर्शन धर्मेश दर्शन ह्यांनी केलं होतं. तर ह्या सिनेमाची एवर ग्रीन असे संगीत नदीम श्रवण, संदीप चोवटा, सुरिंदर सोधी, नदीम सैफी ह्यांनी मिळून केलं होतं. तेव्हा ह्या सिनेमाचे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. ६५ करोडची कमाई सुद्धा केली होती. बऱ्याच दिवसापासून ह्या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची चर्चा सुरू आहे. सुनील शेट्टीने एका वृत्त वाहिनेला दिलेल्या मुलाखतीत सुद्धा ही गोष्ट मान्य केली आहे.
निर्माता रजत जैन धडकन २ बनवणार आहेत. सुनील शेट्टीने सुद्धा ह्या बातमीला दुजोरा देत म्हटलं की ह्या सिनेमात त्याचा मुलगा अहान शेट्टी सोबत अक्षय कुमारचा मुलगा आरव कुमार ह्यांची जोडी दिसावी. कारण दुसऱ्या भागात जर अक्षय आणि मी काम केलं तर म्हातारे झालेलं आम्ही त्यांची लवस्टोरी कोण पाहणार? म्हणून माझ्या आणि अक्षयच्या मुलाला घेऊन हा सिनेमा करावा. शिल्पाची मुलगी तर अजुन खुप लहान आहे त्यामुळे ती मोठी होत पर्यंत खूप वेळ जाईल. म्हणून आता निर्मात्यांनी ह्याचा विचार करावा.
धडकन २ येण्यासाठी अजुन बराच कालावधी तर नक्की जाईल. पण तुमच्या मते ह्या दोन मोठ्या स्टारच्या मुलांना घेऊन चित्रपट बनवला जाईल का नाही? काय वाटतं तुम्हाला? नक्की कळवा.