मित्रानो या जगात देवावर विश्वास नाही अशी माणसे फारच थोडी आहेत आणि जी आहेत त्यांनाही संकट काळी देवाची आठवण नक्कीच येत असेल. कारण अशा वेळी धाऊन येतो तो फक्त देव असतो. पण तो कसा येतो हे आपल्याला कधीतरी माहीत होते का तर नाही. मित्रानो तुम्ही जेव्हा देवाची मनापासून भक्ती करत असाल तर तुमच्या कठीण काळात तो नेहमीच तुमच्या सोबत राहणारा हे एक सत्य आहे. आता ज्या लोकांचां देवावरच विश्वास नसेल त्यांना आमची ही पोस्ट ही आवडणार नाही पण जे खरोखर देवाला मानतात मग तो कोणताही देव असो त्यांना ही पोस्ट नक्की आवडेल
जसं या जगात नकारात्मक शक्ती यांचं अस्तित्व आहे तसेच देवाचे अस्तित्व नक्कीच आहे. आता तुम्ही म्हणाल आम्ही अजुन तरी पहिला नाही देव, पण तुमच्या आयुष्यात खरोखर ज्या काही चांगल्या गोष्टी घडत आहेत त्यांच्या मागे खरच देव आहे हे मात्र नक्की. किंवा कधी आपल्या आयुष्यात एखादे संकट आले आणि त्यावेळी अचानक ते संकट आपल्यापासून लांब निघून गेले तर समजून जा त्यामागे तुमचा देव उभा असतो.
म्हणतात ना जैसे ज्याचे कर्म तसे फल देतो रे ईश्वर, याचा अर्थ काय तर माणूस मिळालेल्या आयुष्यात जसे कर्म करतो त्याच्या बदल्यात त्याला नेहमी फळ मिळत असते, वाईट कर्म केल्यावर वाईट फळ मिळणार आणि चांगले कर्म केल्यावर चांगलेच फळ मिळणार हे वास्तविक सत्य आहे आणि ते कधीतरी तुमच्या आमच्या नशिबात आलेले असतेच. म्हणून जेव्हा आपण चांगले कर्म करतो ते कर्म आपल्या संकटाच्या वेळी नेहमीच कामी येतात.
यांच्यासाठी स्पेशल अशी माणसे देव कधी निवडत नाही म्हणून नेहमी चांगले कर्म करा.
जेव्हा तुम्ही एखाद्या संकटात सापडलेले असता आणि तुमच्याकडे त्यातून बाहेर पडण्याचा कोणताच मार्ग नसतो आणि त्यावेळी नेमका कोणीतरी ओळख नसलेला व्यक्ती येऊन तुमची मदत करतो समजून जा तो तुमच्यासाठी देव आहे.
जेव्हा कधी तुम्ही त्रासलेले आणि खिन्न, उदास असता आणि तुमच्या हातून कोणतेच काम होत नसेल आणि समोरून आलेली व्यक्ती बोलेल हे काम फक्त तूच करू शकतोस तेव्हा खरचं तुमच्यासाठी स्वतः देव धाऊन आले हे समजून जा.