कापूर हा आपण देवाच्या पूजेसाठी वापरतो पण हाच कापूर का वापरला जातो हे तुम्हाला माहीत आहे का? कारण कापूर जळण्यामुळे आपल्या घरातील वातावरण एकदम पवित्र होते. त्यामुळे आपल्या घरातून डास ही पळून जातात. कापुरचा सुगंध आपल्या घरातील वातावरणात असणारे सूक्ष्म जीव जंतू यांचा नाश करते. शिवाय या वासामुळे घरातील नकारात्मक शक्तींचा नाश होतो आणि सकारात्मक वातावरण आपल्या घरात निर्माण होते.
कापसाचे अनेक वैज्ञानिक फायदे आहेत. शिवाय हिंदू धर्मांमध्ये कापूर जाळणे पवित्र मानले जाते. मग आपल्या घरात कोणतेही सन किंवा देवाची पूजा किंवा होम हवन असेल तरीही कापूर वापरला जातो. पण देवाच्या पूजेसाठी वापरला जाणारा हा कापूर आपल्या आरोग्याच्या दृष्टीने ही तितकाच फायदेशीर आहे हे तुम्हाला माहीत आहे का?
कापूर हा अनेक औषधामध्ये वापरला जातो त्याचप्रमाणे संधिवातावर ही कापूर अत्यंत उपयोगी आहे.
तुम्हाला जखम झाली असेल तर कापरामधे थोड पाणी मिसळून ते त्या जखमेवर लावा कापूर मध्ये भरपूर अँटीबायोटिक तत्व असतात त्यामुळे जखम लवकर भरून येण्यास मदत होतील.
तुम्ही केसातील कोंड्या मुळे हैराण झाले असाल तर खोबऱ्याच्या तेलात कापूर मिसळा आणि हे मिश्रण केसांना चोळा आणि अर्ध्या तासाने केस धुवा.
तुमचे दात दुखत असतील तर त्या ठिकाणी कापूर चुरा टाका त्यामुळे नक्की तुम्हाला फरक जाणवेल.
तुमच्या त्वचेसाठी ही कापूर अत्यंत उपयोगी आहे तुमची त्वचा हिरमुसली असेल तिला टवटवीत आणि तजेलदार करण्यासाठी कापराचा उपयोग योग्य आहे.
तुमच्या घरात कोणालाही संधिवाताचा त्रास होत असेल तर अशा लोकांनी त्या भागाला कापराच्या तेलाने मालिश करावी. शिवाय भाजल्यास त्या ठिकाणी ही कापराचे तेल लावावे त्यामुळे जळजळ कमी होते.
मित्रानो तुमच्याकडे सुद्धा असे महत्वपूर्ण माहिती असेल तर आम्हाला नक्कीच कळवा. आम्ही ते लोकांपर्यत पोहोचवु.